Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अॅनिमियाला रोखण्यासाठी ‘असे’ असावे डाएट


लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो असा रक्तक्षय. का होता हा? आणि कशी करतो उपाययोजना आपण? हा विकार होऊ नये म्हणून आणि झाला असेल तर बरा व्हावा म्हणून काय करावे?. ..तर ही समस्या बरी होण्यामध्ये आहाराचा मोठा वाटा आहे. एकतर हा विकार बऱ्याच उशीरा लक्षात येतो. डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार आणि लोह असणारे टॉनिक घेतल्यास आयर्न टोनिक घेऊन येतो. पण त्याने तात्पुरता फरक पडतो परत परिस्थिती जैसे थे! असे का बरे होते?
तर लोह या अतिसूक्ष्म प्रमाणात लागणाऱ्या क्षाराचे प्रमाण शरीरात एकूण क्षाराच्या तुलनेत १% इतके असते. लोह आपल्या नैसर्गिक अन्नात असतेच. परंतु ते रक्तात जाऊन त्याचा उपयोग होण्याकरिता इतर अन्नघटकांची मदत लागते. यात कॉपर, माग्नेशिअम, जीवनसत्व इ, पूर्ण प्रथिने, जीवनसत्व ब ६, जीवनसत्व क. त्यामुळे केवळ टॉनिक घेऊन फायदा होत नाही. तर त्याच्याबरोबर व्यवस्थित आहार करावा लागतो. जीवनसत्वाअभावी जो अॅनिमिया होतो तो ओळखून उपाययोजना करावी लागते. नाहीतर अतिरिक्त टॉनिकमुळे अपाय होऊ शकतो. म्हणून आधी अॅनिमिया कशामुळे झाला आहे, कोणत्या प्रकारचा झाला आहे याची चाचणी करून मगच नेमके औषध घेता येईल.
तर मग कसे मिळवता येईल लोह अन्नातून? तर नुसते लोह असलेल्या पदार्थांची यादी आपल्याला नको आहे कारण ती आता बर्याच पुस्तकांमधून पण मिळेल. तर ते लोह रक्तात मिसळण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यता असते आणि ते सुद्धा कशातून मिळतील आणि हे सगळे अन्नघटक एकत्रित आपल्याला कसे घेता येतील याचा विचार करायला हवा.
* मांसाहारात असलेलं लोह हे पटकन रक्तात मिसळते. त्याचा अॅनिमियामध्ये खरंच उपयोग होतो. परंतु शाकाहारी जेवणातून हे लोह मिळवण्यासाठी बरेच अन्नघटक लागतात. शाकहारी पदार्थांमधून मिळालेलं लोह रक्तात मिसळण्या साठी ‘क’ जीवनसत्वाची गरज असते. म्हणून जेवणात लिंबाची फोड हवी.
* कोथिंबीर, पुदिना, हिरव्या भाज्या, आख्खा मसूर, बाजरी, गूळ, खजूर, काकवी, आलू यात बरेच लोह असते. पीठ फुगवून पदार्थ करणे, कडधान्य मोड आणून खाणे यातून बाकीचे अन्नघटक मिळून शरीराला लोह मिळू शकते.
* पूर्ण प्रथिने मिळण्यासाठी ३ वेळच्या खाण्यात एकदा तरी प्रथिनांचा म्हणजेच धान्य व डाळ एकत्र येई असे अन्न घ्यावे. १ चमचा तरी घरचे तूप जेवणात असेल याची काळजी घ्यावी. घरी काढलेले ताजे लोणी १ चमचा खाल्लेले चांगले.
* तेलबिया, फळे रोज खायला हवे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भुकेच्या वेळी हे सगळे खायला हवे. कारण जठारामधील हायड्रोक्लोरिक आम्ल हे लोहाच्या अभिशोषणामध्ये महत्वाचे असते. भूक लागलेली असताना जे लोक वडा-पाव, समोसा, केक, चहा कॉफी यांनी पोट भरून गेले तर हा अॅनिमिया कधीच पाठ सोडणार नाही.
* पूर्वी गरीब लोकांना हा आजार जास्त होतो कारण त्यांचा आहार व्यवस्थित नसत असे वाटायचे पण आता सधन कुटुंबातील लोकांनाही हा विकार होतो. कारण आपल्या बदलत चाललेल्या सवयी आणि आपली बदललेली अभिरुची.
लहान बाळांना सुद्धा अॅनिमिया होतो तो आईच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याने. कितीतरी गरोदर स्त्रियांना गरोदरपणात सुद्धा हा त्रास होतो याचे कारण अनेक वर्षांपासून आहारत असलेली प्रथिनांची कमतरता. आणि माता होण्यासाठी आपले शरीर सक्षम आहे का ते आधी तपासून पाहणे. गर्भार असतानाच बाळ स्वतःचा लोहाचा साठा करत असते. आणि जर आईमध्येच कमतरता असेल तर याचा त्रास आईला तर होतोच पण त्या बाळालासुद्धा होतो. यासाठी ही काळजी घ्या.
* बाळ मोठे झाले की साधारण सहाव्या महिन्यापासून त्याला सगळे थोडेथोडे खाण्याची सवय लावावी. कारण नुसत्या दुधाने आजिबात पोषण होत नाही. दुधात चांगले अन्नघटक असले तरी त्यात ‘क’ जीवनसत्व आणि लोह आजिबात नसते.
* ९ महिन्यानंतर बाळाच्या शरीरात पाचक रसांच्या दृष्टीने काही बदल होतात. त्याप्रमाणे दुधाचा वापर कमी करून इतर अन्नाचा वापर सुरु केला नाही तर दुधाचे पूर्ण पचन होत नाही. आणि त्या बाळाची वाढही नीट होत नाही. यासाठी विनिंग फूड म्हणजेच आईच्या दुधावरून बाजूला करून इतर अन्नपदार्थ देणे गरजेचे असते. त्यातच खूप पौष्टिक जेवण म्हणून अनेक महिला बाळांना नुसता दुध भात कींवा तूप भात भरवतात. यातून फक्त कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ मिळतात. परत एकदा प्रथिने व जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो ते पण ऐन वाढीच्या वयात जेवा बाळाचा मेंदू सुद्धा वाढत असतो.
* मोठ्या लोकांना होणाऱ्या अॅनिमियाची कारणे शोधायचे ठरवले तर आधी समोर येतो तो कामाचा ताण तणाव, नीट जेवायला न मिळालेला वेळ आणि त्यामुळे समोर येईल मिळेल ते खाणे व भूक भागवण्याचे प्रकार यांमुळे अॅनिमिया होतो.
* अतिरिक चहाचे सेवन तेही जेवण झाल्यावर. या जेवण नंतरच्या चहा कॉफी मुळे जेवणातून जे काही अन्नघटक गेले ते रक्तात जाण्यापासून रोखले जातात.

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ
http://www.loksatta.com/lifestyle-news/important-diet-tips-for-controlling-anemia-1497354/


This post first appeared on Healthy Mantra, please read the originial post: here

Share the post

अॅनिमियाला रोखण्यासाठी ‘असे’ असावे डाएट

×

Subscribe to Healthy Mantra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×