Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’





या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

-    संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)    

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-       
  “त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

-   "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-    
  “औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1.       १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2.       ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3.       ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4.       दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5.       याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6.       १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7.       १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.



अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१.       ९ मे  १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२.       एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३.       हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४.       सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.


उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!



© 2017, Shantanu Paranjape


This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×