Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पावसाळ्यातील स्वच्छंद भटकंती

आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. चहुबाजूनी येणारे पावसाचे ढग सह्याद्रीच्या कड्यांना धडकत आहेत, अशा पावसाळी धुंद वातावरणात घरातून बाहेर न पडावेसे वाटले तर नवलच. तर या पावसाळी वातावरणात कुठे फिरावे याबद्दल हा लेख.

किल्ले- महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर धुव्वांधार पाउस पडतो. त्यामुळे पावसात गडांवर जाताना जरा जपूनच. शिवाय धुके आणि निसरड्या पायऱ्यांचा धोका असल्याने अवघड किल्ले टाळावेत. मात्र कोरीगड, तुंग, तिकोना,सुधागड,राजमाची अशा किल्ल्यांवरील केलेली पावसाळ्यातील भटकंती ही नक्कीच सुखावह असेल.
पळू-सोनावळे लेणी

मंदिरे- पावसाळ्यात राउळांची भटकंती करण्यासारखे सुख नाही. मस्त पैकी गाडीतून पावसाचा आस्वाद घेत आपण सहकुटुंब एखादी छानशी ट्रीप काढू शकता. भुलेश्वर, बहादूरगडामधील मंदिरे, गोंदेश्वर, खिद्रापूर ही मंदिरे आवर्जून पहावीत अशी.

पाटेश्वर मंदीर देगाव- सातारा येथून दिसणारा परिसर

लेणी- या पावसाळी वातावरणात सह्याद्रीची कातळलेणी अजूनच खुलून दिसतात. वर्षभर बसलेली धूळ नाहीशी होऊन त्या कातळाला नवीन लकाकी येते आणि लेणीतील गंभीर वातावरणाला गरजणाऱ्या पावसाची साथ मिळून एक वेगळीच अनुभूती येते. या मस्त वातावरणात थोडी आडवाटेवर असणारी येलघोल, पाले लेणी, बेडसे लेणी, कान्हेरी लेणी आवर्जून पहावीत अशी.

येलघोल लेणी

अभयारण्ये-
या पावसाळी वातावरणात तसे मोठे प्राणी कमीच दिसतात आणि त्यात बहुतांश
अभयारण्ये ही पावसात बंद असल्याने पर्यटकांची निराशा होते. पण आपण जर खरच हौशी पर्यटक असाल तर आंबोली येथील कीटक सृष्टी किंवा भीमाशंकर अभयारण्यात गर्द झाडीत केलेली भटकंती नक्कीच आवडेल अशी.



पावसाळ्यात वाहणारे धबधबे, विविध प्रकारचे कीटक, रानफुले, लेण्यातील शांतता आणि गडकिल्ल्यांवर ढगात राहण्याचा अनुभव घेण्यासाठी पायाला भिंगरी लाऊन ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ ही जरूर करावी अशीच आहे.




This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

पावसाळ्यातील स्वच्छंद भटकंती

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×