Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अप्सरा आली..

मराठी चित्रपट सृष्टीचा परवणीचा काळ आला आहे याची ऊदाहरणे आजकाल भरपुर दिसु लागली आहेत. याचा प्रत्यय म्हणुन आजचे बहुतेक निर्माते आणी दिग्दर्शक बरेचसे नाजुक आणी "हटके" विषय हाताळताना दिसतात. मग तो अगदी मंगेश डाहवळे चा "टिंग्या" असो , किंवा सुमित्रा भावे आणी सुनील सुखटणकर यांचा "वास्तुपुरुष" आसो , किंवा "शिक्षणाच्या आईचा घो" म्हणणारा महेश मांजरेकर आसो, वा कलावंताची कैफियत मांडणारा रवी जाधवचा "नटरंग" असो, सच्चा मराठी प्रेक्षकास ह्या मेजवानीची आता सवयच झाली आहे .

तमाशा प्रधान चित्रपट मला कधीच अवाडले नाहीत. "पिंजरा" सोडला तर असे चित्रपट मी पहिल्या पासुन avoid करतो. पण "नटरंग" बद्दल "हा चित्रपट तमाश्याच्याही पुढे जाऊन विविध स्थरावरचे विषय मांडतो" असे अतुल कुलकर्णींचे भाष्य ऐकले आणी म्हणुन तो पाहण्याचा ठरवला. अतुलचे म्हणणे तंतोतंत खरे होते हे चित्रपट संपल्यावर कळाले. अतुलची स्वत:ची या चित्रपटासाठीची मेहनत चित्रपट अंती आपल्याला थक्क करुन सोडते. त्याच्या अभिनयास तोडीस तोड देणारे किशोर कदम, सोनाली कुलकर्णी, विभावरी देशपांडे यांचे अभिनय अतिशय अप्रतिम आहे. अजय अतुल या जोडीने दिलेलं संगीत चित्रपट पाहिल्यानंतर बरेच दिवस डोक्यात वाजत राहतं. नेपथ्य, दिग्दर्शन , चित्रीकरण, छायाचित्रीकरण, संगीत, नृत्य अशा सर्व पैलूंनी ऊकृष्ट असलेला "नटरंग" आपल्या मनात कुठेतरी घर नक्कीच करुन जातो.

कलेचं प्रेम माणसास सर्व संकटांना तोंड द्यायला कसं शिकवतं हे या चित्रपटात अप्रतिम दृष्ट्या दाखवलं आहे. त्याच बरोबर perseverance , dedication, passion म्हणजे काय असतं याचं प्रगल्भ दर्शन प्रेक्षकास मिळतं.

एका गावातील एका रांगड्या पैलवानाची ही कथा आहे. यास तमाशाचं प्रचंड वेड. स्वत:चा तमाशाचा फड असावा आणी त्यात आपण राजा म्हणुन मिरवावं हे त्याचं स्वप्नं. पण कालमानापरत्वे या राजाचा "नाचा" कसा होतो हे या कथेचं मर्म आहे. पैलवान ते नाचा हा मानसिक, शारीरिक प्रवास अतुल कुलकर्णींनी सुरेख रित्या दिर्शविला आहे. माणसाचं profession त्याच्या वैयक्तिक जीवनात कसं हस्तक्षेप करु शकतं हे या कथेतुन प्रतीत होतं.

सर्वच बाबतीत ऊकृष्ठ असलेला हा चित्रपट Oscar साठी गेला तर मला तरी काही नवल वटणार नाही. "नटरंग" is truly a masterpiece. मराठी रसीकाने तो जरूर पहावा..



This post first appeared on JAy's Den, please read the originial post: here

Share the post

अप्सरा आली..

×

Subscribe to Jay's Den

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×