Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शहराच्या सुरक्षेला लागलायं ‘चुना’

सराफावरील हल्ल्याच्या निषेधार्थ 
व्यापारी व नागरीक रस्त्यावर

फलटण: फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात घडसोली मैदानासमोरील रस्त्यावर गुरुवारी (ता. 8) रात्री सुमारे 8 वाजून 20 मिनीटांच्या दरम्यान अशोक ज्वेलर्सचे मालक अशोकशेठ गांधी व सुशील गांधी यांच्यावर दोन जणांनी हल्ला करुन लुटमारीचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (ता. 9) रोजी शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी एकत्र येवून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये सुमारे एक हजार व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापार्‍यांनी उस्फूर्त बंदही पाळला. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराच्या कायदा व सुव्यस्थेचा प्रश्र्न ऐरणीवर आला आहे.

अशोकशेठ गांधी व सुशील गांधी हे सायंकाळी दुकान बंद करुन घरी जात असताना घडसोली मैदानासमोर त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या दोघांनी जोरदार प्रतिकार केल्याने हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गांधी पीतापुत्रांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्रीच वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने शहरातील व्यापार्‍यांनी गांधी पितापुत्रांची रुगालयात येवून गाठ घेतली. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 8 रोजी व्यवसाय बंद ठेवण्याचे व निषेध मोर्चा काढण्याचे ठरले.


मागील गुन्ह्याच्या तपासाचे झाले तरी काय?
अशोक ज्वेलर्समध्ये सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी जबरी चोरी झाली होती. त्या गुन्ह्याचा तपास अजुनही झाला नाही. या चोरीचा तपास लागणार का? की यावेळीही पहिले पाढे पंच्चावन अशी परिस्थिती होणार?, अशी शंका व्यापार्‍यांच्या व नागरीकांच्या मनात निर्माण झाली.

धिंगाणा सुरु असताना पोलीस चौकात
घडसोली मैदानासमोर गांधी यांच्यावर हल्ला सुरु असताना पोलीस नजिकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असल्याचे अनेक व्यापार्‍यांनी सांगितले. पोलीसांना सांगूनही त्यांनी घटनेचे गांभीर्य घेतले नाही, अशीही व्यापारी व नागरीकांच्यात चर्चा होती.

काही अधिकार्‍यांना म्हणे; होळीच माहित नाही
मोर्चाच्या दरम्यान व्यापारी काही पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करत होते. यावेळी काही पोलीस अधिकार्‍यांना होळीच माहित नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितल्याचे समजते. पण वास्तविक होळीसाठी व धुलीवंदनासाठी बंदोबस्त होता का? यामुळे अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या.


शुक्रवारी सकाळी सात वाजता शंकर मार्केट पासून सुरु झालेला हा निषेध मोर्चा शिंपी गल्ली, उघडा मारुतीमार्गे बारामती चौक, छत्रपती शिवाजी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, श्रीराम बझार व आजुबाजुचे गाळे पुन्हा क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा, गिरवी नाका, व्यापारी महासंघाचे निवेदन देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय, पुन्हा गिरवी नाका, स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा, गजानन चौक, क्रांतीवीर उमाजी नाईक चौक, महावीर स्तंभ, व्यापारी महासंघाचे निवेदन नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे यांच्याकडे नगरपालिका कार्यालयासमोर सुपुर्त केला. यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको केल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.

यावेळी व्यापारी महासंघ व ऑल इंडिया ह्युमन असोसिएशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. व्यापारी महासंघाने व ऑल इंडिया ह्युमन राईटस असोसिएशनने दिलेल्या निवेदनामध्ये अशोक गांधी व सुशील गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना हि निंदनीय असून या घटनेचा सर्व व्यापार्‍यांच्या वतीने निषेध केला जात आहे. या घटनेमुळे व्यापार्‍यांच्यात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा त्वरीत तपास करुन गुन्हेगारास योग्य ती कडक कारवाई करावी. या गुन्ह्याचा तपास न लागल्यास सर्व व्यापारी बेमुदत दुकाने बंद ठेवतील, असा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.


This post first appeared on फलटण (Phaltan), please read the originial post: here

Share the post

शहराच्या सुरक्षेला लागलायं ‘चुना’

×

Subscribe to फलटण (phaltan)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×