Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

टी टी एम एम तुझं तू माझं मी मराठी मूवी रेव्हिएव

सिनेमा : टी टी एम एम तुझं तू माझं मी
कलाकार : ललित प्रभाकर, नेहा महाजन, विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतीश पुळेकर, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, पुष्कर लोणारकर, कादंबरी कदम,
लेखन : तेजपाल वाघ,
छायाचित्रण : मयूर हरदास,
संगीत : पंकज पडघन
दिग्दर्शन : कुलदीप जाधव
निर्मिती : वैशाली एंटरटेनमेंट, इरॉस इंटरनॅशनल.

परिणाम । प्रभाव : पाच पैकी अडीच २.५/५

बरं : टी टी एम एम म्हणजेच तुझं तू माझं मी हि आजच्या तरुणाईची, आजची गोष्ट. याच मुले आज वर्तमानात जगणाऱ्या प्रत्येकाला ती आपली वाटते. यातले हलके फुलके संवाद सिनेमाला आणि बघणार्यालाही हलतं ठेवतात.  शिवाय प्रत्येक कलाकाराने आपलं काम सिनेमा बघणार्याला आपलासा वाटण्याजोगं केलंय. श्रवणीय संगीत हि या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू.

वाईट : सिनेमातील जय आणि राजश्री या मुक्ख पात्रांचा भावनिक प्रवास बघताना त्यांच्या जगण्याची आणि वागण्याची कुठेच सांगत लागत नाही. गंभीर विषयावरचा हा सिनेमा हलका फुलका ठेवण्यासाठी त्यात विनोदाचा वापर केलाय. पण काहीवेळा तो अतीच होतो. आजच्या गोधळलेल्या पिढीचा हा सिनेमा आणि त्याचा शेवट सुटसुटीत असं काही हाती न देता बघणार्यांनाच गोंधळून टाकतो.

परीक्षण

कथा : हि आहे जय आणि राजश्री यांची कथा काम गोष्ट. पैकी जय हा जग फिरण्याचं स्वप्न बाळगून असलेला मुलगा. ज्याला सध्यातरी लग्न, वगैरे करून संसारात अडकून पडायचं नाहीये. तर राजश्री हि लग्नाळू मुलगी तिला लग्न करायचंय पण तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराशी. आणि आपल्याला हा राजकुमार सापडण्याचा राजयोग आहे याचा तिला विश्वासही आहे. अशात होत काय कि जय आणि राजश्रीचं त्यांचा मनाविरुद्ध आपण शोधलेल्या जोडीदारांशी लग्न पार पडण्याचा घाट घरातले घालतात तो झुंगारून जय एन लग्नातून तर राजश्री घरातून पळून जाते. अर्थात हे पळून नेमके कुठं जाणार आहेत. काय करणार आहेत या दोघांनाही माहित नाहीये. अशात या पाळपुट्यांची पहिली भेट अपघातानेच गोव्याला जाणाऱ्या एका बसमध्ये होते. त्यानंतर पुढे काय होत हे प्रत्यक्ष सिनेमात बघणं बरं ठरेल.

लेखन : आजची आणि आपली प्रत्येकाची गोष्ट हि या सिनेमाची जमेची बाजू. मात्र गोष्ट काम कथेची पटकथा होताना लॉजिक नावाची गोष्ट पाळावी लागते. त्याबाबत इथे भ्रमनिरास होतो. लग्न नाकारून  ऐन मंडपातून पळून जाणारा जय पुढे नाटक म्हणून का असेना पण तीन तीन लग्न करतो हि गोष्ट पटत नाही. तीच गोष्ट राजश्रीची. सुरुवातीला लग्नासाठी आसुसलेली ती शेवटाला मात्र लग्न न करण्याकडे का वळते हेही काळात नाही. मुक्ख पात्रांचा या वागण्यातील विसंगतीमुळे संपूर्ण सिनेमाचं  विसंगतीचा दिशेने प्रवास करून त्याचा शेवट गोड करण्यात आला असला तरी बघणार्यांना तो गोंधळात टाकून सोडतो. सिनेमातील संवाद मात्र हा गोधळ कमी करण्याचा प्रयत्न अगदी पुरेपूर करतात.

दिग्दर्शन : दिग्दर्शन म्हणजे सिनेमाला, सिनेमातल्या गोष्टीला दिशा देणं. वरवर हा प्रकार सोपा वाटत असला तरी वाटतो तितका तो सोपा नाहीये. उदाहरणादाखल याच सिनेमातील भारत गणेशपुरे यांनी साकारलेला सुरुवातील सिंघम एंट्री घेणारा इन्स्पेक्टर बांदेकर थोड्याच वेळात माहेरची साडीमधल्या अजिंक्य देवा सारखा का वागला लागतो याची संगती लागत नाही. हा पटकथेतला गोंधळ खरतर दिग्दर्शकाला शोधून तो सुधारण, कमी कारण अपेक्षित होत. पण या दिग्दर्शकांना मात्र शक्य झालेलं नाहीये. आजची पिढी आणि तिच्या जगण्याचं गोंधळ दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले असले तरी त्यात सिनेमा भरकटत जातो. आणि तो समताना याचसाठी केला होता का अट्टहास ?  हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अभिनय, संगीत, कला दिग्दर्शन या बाबतीत मात्र दिग्दर्शकाची पकड दिसते.

छायाचित्रण : गोष्टीच्या गरजेप्रमाणे सिनेमाला फ्रेश आणि तरुण ठेवणार छायाचित्रण. दोन दृश्यांसाठी केलेला ड्रोनचा वापर अगदी सुयोग्य. विशेषतः जय आणि राजश्री यांच्या प्रवासातील दृश्ये बघणेबल झाली आहे.

संगीत : साजिरी गोजिरी हे सिनेमाच्या सुरुवातीला असणार गाणं आपल्याला ठेका धरायला भाग पडतं. अशीच सिनेमाच्या गोष्टीचा हात धरून आलेली इतरही गाणी सिनेमा सुसह्य आणि श्रवणीय करतात. तर पार्श्वगायक सिनेमाच्या परिणामकारकतेत भर घालतं.



This post first appeared on History Of Tina Ambani, please read the originial post: here

Share the post

टी टी एम एम तुझं तू माझं मी मराठी मूवी रेव्हिएव

×

Subscribe to History Of Tina Ambani

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×