Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे 'कर्नल जेम्स वेल्श' याने काढलेले स्केच


महाराष्ट्रावर जेव्हा इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांचे डॉक्युमेंटेशन करायचे काम सुरु केले तेव्हा ब्रिटीश अधिकारी 'कर्नल जेम्स वेल्श' याने इ.स. १८३० साली महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचे स्केच काढले. या स्केचेस मधून इ.स. १८३० साली महाराष्ट्रातील किल्ल्यांची स्थिती काय होती हे आपल्याला समजायला मदत होते. 'कर्नल जेम्स वेल्श' याने आपल्या Military Reminiscences Vol 1 या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांची काही स्केचेस काढली त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, चांदवड, धोडप आणि गाळणा या किल्ल्यांचे इ.स. १८३० साली काढलेले स्केचेस बघायला मिळतात.

चांदवड किल्ल्याचे १८३० साली काढलेले स्केच.    

सोलापूर किल्ल्याचे १८३० साली काढलेले स्केच.

धोडप किल्ल्याचे १८३० साली काढलेले स्केच.

गाळणा किल्ल्याचे १८३० साली काढलेले स्केच.

अहमदनगर किल्ल्याचे १८३० साली काढलेले स्केच.

(टीप:- किल्ल्यांची स्केचेस हि Military Reminiscences Vol 1  या पुस्तकातील आहेत. तसेच सगळी स्केचेस हि कर्नल जेम्स वेल्श यांनी काढलेली आहेत.)
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Military Reminiscences Vol 1:- Col. James.Welsh, Smith, Elder and Co., Cornhill 1830.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा   




   

Share the post

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे 'कर्नल जेम्स वेल्श' याने काढलेले स्केच

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×