Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'


पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला एक पुराणपुरुष असलेला पर्वत म्हणजे 'हरिश्चंद्रगड'. भटक्यांची पंढरी असलेल्या या 'हरिश्चंद्रगडाला' विशेष महत्व लाभले आहे ते त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. 'हरिश्चंद्रगड' येथे जाण्यायेण्याच्या वाटा गिर्यारोहकांना आता अगदी माहिती आहेत. खिरेश्वर, पाचनई या वाटांवरून सतत गिर्यारोहक येत असतात तसेच 'नळीची वाट' आता हि फारच प्रसिद्ध वाट झालेली आहे. यापैकी 'नळीच्या वाटेवरून' वरती येतो तेव्हा आपण 'कोकणकड्याजवळ' येतो. तसेच 'पाचनई'  आणि 'खिरेश्वर' मार्गे आपण 'हरिश्चंद्रगडावर' असणाऱ्या 'हरीश्चंद्रेश्वर' मंदिराच्या इथे आपण येऊन पोहोचतो. मुळात सगळे भटके 'हरिश्चंद्रगड' येथे येतात ते केवळ 'कोकणकडा' बघायला आणि 'इंद्रवज्र' बघायला. परंतु पौराणिक आख्यायिकेंसोबत 'हरिश्चंद्रगड' येथे असलेल्या 'लेण्या' आणि 'मंदिरे' देखील फार महत्वाच्या गोष्टी आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे तब्बल 'आठ शिलालेख' आहेत.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत. 'हरिश्चंद्रगड' येथील लेण्या या 'हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यापासून' जवळपास ६०० फुट खाली आहेत. या लेण्या ओबडधोबड असून आतमध्ये जास्त शिल्पकाम आपल्याला आढळून येत नाही. काही लेण्यांच्या दारांंवर आपल्याला 'गणेशपट्टी' आढळून येते. तसेच या लेण्या या आतून देखील फार मोठ्या नाहीत तसेच या लेण्यांच्या आतील खांब देखील हे फारसे सुबक नाहीत आणि त्याच्यावर जास्त कोरीवकाम आपल्याला आजिबात दिसत नाही. गिर्यारोहक या लेण्यांचा वापर राहण्यासाठी करतात. या लेण्या जर नीट पाहिल्या तर आपल्याला त्यांच्या आतमध्ये मोठमोठे ओबडधोबड तासलेले चौकोनी खांब पाहायला मिळतात तसेच भिंतींच्या जवळ आपल्याला ओटे देखील पाहायला मिळतात. याच लेण्यांच्या अगदी खालच्या बाजूला आहे ती 'हरिश्चंद्रगडावर' असलेली 'पुष्करणी' या प्रसिद्ध 'पुष्करणीच्या' दक्षिणेला काही देवळ्या आहेत ज्याच्यामध्ये बसून आत्ता सध्या लोकं फोटो काढतात. या देवळ्यांंमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. हि पुष्करणी 'हेमाडपंथी' पद्धतीची आहे हे तिच्या स्थापत्यशैलीवरून समजते. याच 'पुष्करणीच्या' आजूबाजूला आपल्याला लहान लहान मंदिरे पाहायला मिळतात तसेच या मंदिरांच्या आजूबाजूला 'किर्तीमुखे' देखील ठेवलेली दिसतात.

'हरिश्चंद्रगडाला' विशेष महत्व लाभले आहे ते त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'.

या पुष्करणीच्या जवळून आपण पुढे आलो की आपल्याला दिसते ते 'हरिश्चंद्रगड' येथील 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर. याची रचना देखील हेमाडपंथी पद्धतीमध्ये आहे. 'हरिश्चंद्रेश्वराचे' मंदिराचा काही भाग हा 'हरिश्चंद्रगडाच्या' पाषाणातून कोरून काढलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या मंदिराचा काही भाग हा दगडांनी बांधून काढलेला आहे. 'हरिश्चंद्रेश्वराचे' मंदिर जर आपण नीट पाहिले तर या मंदिराला आपल्याला कुठेही सभामंडप दिसून येत नाही. 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराला चारही बाजूने आपल्याला दरवाजे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. याच 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच जर आपण 'हरिश्चंद्रगड' नीट पाहिला तर संपूर्ण गडावर आपल्याला मोठ्या प्रमाणात 'शिवलिंग आणि शाळुंका' या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात याच्यावरून हे नक्की समजते कि 'हरिश्चंद्रगड' हे 'शैवउपासकांचे' स्थान होते हे समजते.

'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या आवारात आपल्याला गुहा पाहायला मिळतात काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत. या गुहा बहुतेक करून तरी 'योग्यांसाठी' राहायला बनवलेल्या असाव्यात. 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा 'तारामती' शिखरावरून खाली वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. येथून पुढे आपण जेव्हा मंगळगंगा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जेव्हा चालत जातो तेव्हा तेथून पुढे आपल्याला डाव्या हाताला एक लेणे बघायला मिळते. हे लेणे 'केदारेश्वर' गुहा ओळखले जाते. 'केदारेश्वर' लेण्याची रुंदी हि जवळपास सहाशे फुट आहे. 'केदारेश्वर' लेणे हे आतमध्ये जवळपास पाच फुट खोल खोदलेले आहे म्हणून या  लेणीमध्ये वर्षभर पाणी भरलेले असते. पूर्वी या 'केदारेश्वर' लेणीमध्ये चार खांब होते सध्या ह्या लेणीमध्ये एकच खांब शिल्लक राहिलेला आहे.

पुष्करणी 'हेमाडपंथी' पद्धतीची आहे हे तिच्या स्थापत्यशैलीवरून समजते. 

'केदारेश्वर' लेण्यामध्ये खांबाच्या मध्ये जवळपास ३ फुट उंच आणि ६ फुट रुंद असलेले 'शिवलिंग' आपल्याला पाहायला मिळते. याच शिवलिंगाला 'केदारेश्वराचे शिवलिंग' म्हणून ओळखतात. याच लेण्यामध्ये एक खोली देखील आहे. या खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. या 'केदारेश्वर शिवलिंगाला' प्रदक्षिणा घालावयाची असल्यास आपल्याला थंड पाण्यातून जावे लागते. हे लेणे मुळातच खोलवर खोदले  असल्यामुळे या लेण्यामध्ये वर्षभर पाणी साठलेले असते. 'गॅॅझेटीयर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॉल्युम १७ अहमदनगर' मध्ये पृष्ठ क्रमांक ७१९ मध्ये या लेण्यातील खांबांची तुलना आपल्याला घारापुरी लेण्यांमधील खांबांशी केलेली मिळते.

'हरिश्चंद्रगड' येथील लेण्यांमध्ये काही शिलालेख आहेत याबाबत इंडियन अँँटीक्वेरी वर्ष ५ वे १८७७ पान क्रमांक ११ या ग्रंथात डब्ल्यू.एफ सिंक्लेअर यांनी 'नोट्स ऑन दि अहमदनगर कलेक्टोरेट' या लेण्यांचे वर्णन करताना लिहिलेले आहे ते पुढीलप्रमाणे:-

"The pit is enclosed on the approachable side by a massive stone wall, outside of which and the pillars of the dharmashala and linga caves are two or three very rude and fragmentary inscriptions, apparently in rather modern Marathi characters; but I had not time to stamp or read them, nor could I get a copy of taken. I fancy they are merely the work of visitors or idlers."

'हरिश्चंद्रगड' याच्यावर असणाऱ्या शिलालेखांच्या बाबत हे उल्लेख फार महत्वाचे ठरतात. याच्यानंतर 'हरिश्चंद्रगड' येथील लेण्यांच्या शिलालेखाबाबत उल्लेख हा 'जेम्स फर्ग्युसन' आणि 'जेम्स बर्जेस' यांनी आपल्या 'केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया' या पुस्तकात पान क्रमांक ४७८ वर केलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

"But the style of the low doorways, and of the pillars in the second cave from the east end of the range the detached sculptures lying about and some fragments of inscriptions, all seem to point to about the tenth or eleventh century."

तसेच 'गॅॅझेटीयर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॉल्युम १७ अहमदनगर' यामध्ये पान क्रमांक ७१९ मध्ये जो उल्लेख आलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-

"The style of low doorways and of the pillars in Cave II., Some detached sculptures lying about the us of Ganpati on the lintels. and some fragments of inscriptions seem to point to about the tenth or the eleventh century as the date of the caves."


याच शिवलिंगाला 'केदारेश्वराचे शिवलिंग' म्हणून ओळखतात.

यानंतर मधल्या कालखंडात आपल्याला 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांच्याबद्दल माहिती कुठेही आढळून येत नाही त्याच्यानंतर या 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांचा उल्लेख आपल्याला थेट आढळतो तो प्रसिद्ध लेखक आणि दुर्गभटक्यांचे लाडके व्यक्तिमत्व गो.नि. दांडेकर यांच्या १९६९ साली प्रकाशित झालेल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात 'हरिश्चंद्र दुर्ग' या प्रवासवर्णन केलेल्या लेखामध्ये पान क्रमांक १५६ आणि १५७ तर आज जी नवीन आवृत्ती बाजारात आहे त्यामध्ये २०००, २००४, २०१२ या तीन आवृत्या या मृण्मयी प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या असून त्यामधील 'हरिश्चंद्र दुर्ग' प्रकरण ११ यामधील पान क्रमांक १७० आणि १७१ यामध्ये आपल्या प्रवासवर्णनामध्ये गो.नि.दांडेकर यांनी उल्लेख केला आहे त्यामध्ये त्यांनी 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख वाचायचा देखील प्रयत्न केला आहे असे दिसून येते. गो. नि. दांडेकर यांच्या 'हरिश्चंद्रगड' येथील प्रवासवर्णनाचा उतारा पुढीलप्रमाणे:-

"मुख्य मंदीराचंं बांधकाम दुर्लक्ष-उपेक्षेमुळे ढासळूंं लागले आहे, तरी तेंं मुळांंत इतकं मजबूत, कींं आणखी दीडदोनशेंं वर्षं हे देऊळ मान टाकणार नाही. बाळाची नजर मोठी चौकस. तो बाहेरून म्हणाला, "आप्पा, इथं शिलालेख आहेत. एकच नव्हे, सहा!" पाहिलं तर खरचं! मंदिराभंवतालींच्या प्रवेशद्वारातून आत शिरण्यापूर्वी दोन्ही बाजवांच्या भिंतींवर शिलालेख कोरलेले. पैकी डावे हाताचे भिंतीवरच्या शिलालेखांतील वरील ओळीचा निम्मा भाग तर सहज वाचता आला -

चक्रपाणिवटेश्वर: नन्दतुतस्य सुत:....

चक्रपाणी वटेश्वर? अरे हा तर वटेश्वर चांगदेव! ज्ञानोबांनी चांगदेवपासष्टीतंं शेवटी म्हटलं आहे-

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे| दोन्ही डोळस आरिसे |
परस्पर पाहातांं कैसे| मुकले भेदा||
                              
पण त्या वटेश्वर चक्रपाणीचा इथे कायं संबंध? त्याचा पुत्र कोण? छे छे! कोडं अधिकाधिक गुंतत चाललं आहे! नव्हे, या लेखांचे ठसे घेतलेच पाहिजेत, पुढल्या वेळी.

केदारेश्वर लेणीमधील खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आपल्याला बघायला मिळतो.

हे महत्वाचे वर्णन आपल्याला 'दुर्गदर्शन' या 'गो. नि. दांडेकर' यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. यानंतर मात्र हे हरिश्चंद्रगड येथील शिलालेख वाचायचा कोणी प्रयत्न केलेला दिसत नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख हे नागपूर विद्यापीठ येथील संशोधक 'प्रा. म. रा जोशी' हे जेव्हा 'हरिश्चंद्रगड' येथे गेले होते तेव्हा त्यांच्या दृष्टीस गडावरील शिलालेख दृष्टीस पडल्यावर त्यांनी 'डॉ. वि. भि. कोलते' आणि महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक 'वि. गो. खोबरेकर' यांना सांगितली. या माहितीनंतर 'वि. गो. खोबरेकर' यांनी पुरातत्व विभागाचे लोकं 'हरिश्चंद्रगड' येथे पाठवून त्या शिलालेखांचे ठसे घेतले आणि 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या विनंतीनुसार 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांचे वाचन 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी या शिलालेखांचे वाचन केले.

'हरिश्चंद्रगड' येथील पाहिला शिलालेख हा 'हरीशचंद्रेश्वर' मंदिराच्याभोवती प्राकाराच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यापूर्वी डाव्या हाताच्या भिंतीवर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. या शिलालेखाची लांबी हि १६० सें.मी. ५ फुट ४ इंच असून याची अक्षरे खूप मोठी आणि ठसठशीत असून प्रत्येक अक्षराची उंची १० ते ११ सें.मी असून रुंदी ७ ते ८ सें.मी आहे. या शिलालेखातील अक्षरे देवनागरी लिपीमध्ये कोरलेली आहेत. या अक्षरवाटिकेप्रमाणे हा लेख साधारणपणेतेराव्या शतकात कोरला असावा असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना वाटते. शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-

चक्रपाणी वटेस्वर नंदनु तस्य सुतु वीकटदेओ

हा पहिला शिलालेख जर आपण पाहिला तर यामध्ये असे दिसून येते की 'चक्रपाणी वटेश्वर' हा महत्वाचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. गो. नि. दांडेकर यांनी जो 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख वाचला त्यामध्ये त्यांनी 'चक्रपाणिवटेश्वर: नन्दतुतस्य सुत:....' अशी अक्षरे वाचली आहेत परंतु 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी शिलालेखावरून जी अक्षरे वाचली आहेत त्यामध्ये 'वटेश्वर:' असा शब्द नसून 'वटेस्वर' असा शब्द आहे. दगड तिथे फुटल्यामुळे दोन पांढरे ठिपके दिसतात तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांना 'श्व' च्या जागी 'स्व' हे अक्षर ठ्श्यामध्ये स्पष्ट आढळून आले आहे. तसेच 'गो. नि. दांडेकर' यांनी वाचलेल्या 'नन्दतु' हा शब्द 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या ठश्यामध्ये 'नंदनु' असा व्यवस्थित दिसतो. तसेच 'सुत:' हा शब्द देखील ठश्यामध्ये 'सुतु' असा स्पष्ट दिसतो. 

अर्थात 'गो. नि. दांडेकर' यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की "या लेखांचे ठसे घेतलेच पाहिजेत, पुढल्या वेळी." त्याचदरम्यान हे ठसे घेऊन त्यांचे वाचन करण्याचे काम 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच वरील शिलालेख हा 'गो. नि. दांडेकर' यांनी नुसत्या डोळ्यांना जेवढी अक्षरे दिसतील तसा वाचला होता हे आपल्याला समजते. तर 'डॉ. वि. भि. कोलते' यांना पुरातत्व खात्याच्या माणसांनी 'हरीशचंद्रगड' येथे जाऊन ठसे घेऊन वाचायला दिला होता त्यामुळे 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्याकडून हे महत्वाचे काम झाले हे आपल्याला पाहायला मिळते. तसेच 'हरिश्चंद्रगड' येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला देखील एक शिलालेख आहे असे गो.नि.दांडेकर यांनी म्हटले आहे परंतु जे शिलालेखांचे ठसे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना मिळालेले आहेत त्यामध्ये हा शिलालेख कोणता हे त्यांना निश्चितपणे सांगता मात्र आलेला नाही. 

'हरिश्चंद्रगड' येथील दुसरा शिलालेख हा 'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला आहे असे स्पष्ट 'डॉ. वि. भि. कोलते' सांगतात. परंतु सध्या या लेण्यामध्ये एकच खांब शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे या लेखाचे महत्व अजून आपल्या दृष्टीने वाढते. या सध्या पडून गेलेल्या खांबावरील लेखाची लांबी हि जवळजवळ ५० सें.मी. आहे. या शिलालेखाचे अक्षरांचे वळण हे प्राचीन असल्यासारखे 'डॉ. वि. भि. कोलते' ह्यांना वाटत होते. त्यांचा कयास असाही होता की हि लिपी 'ब्राम्ही' असावी. परंतु ह्या शिलालेखाची अक्षरवाटिका हि प्राचीन देवनागरी लिपीचे स्वरूप दाखवते. ह्या शिलालेखाचे वाचन करण्यासाठी 'डॉ. वि. भि. कोलते' यांना 'महामहोपाध्याय वा. वि. मिराशी' यांनी केली तसेच या लेखाचे वाचन देखील 'महामहोपाध्याय वा. वि. मिराशी' यांनीच 'डॉ. वि. भि. कोलते' यांना सुचविले.या 'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला शिलालेख पुढीलप्रमाणे:-

[सिद्धं] श्री गुहेश्वर भैरव 

या दर्शनी स्तंभावर कोरलेल्या शिलालेखामधील सुरुवातीची अक्षरे अस्पष्ट आहेत.'सिद्धं' किंवा सिद्ध हा शब्द तेथे असावा असे तेथे वाटते. तसेच या शिलालेखात 'श्री' हे अक्षर फार मोठे कोरले आहे हे ठश्यावरून समजायला मदत होते. तसेच 'गुहेश्वर' या शब्दामधील 'गु' हे वाक्य अक्षर देखील ठश्यावरून व्यवस्थित वाचता येते. तसेच मधल्या भागात एक आडवी रेघ मारलेली दिसते हि रेघ बहुदा दगड फुटल्यामुळे दिसत असावी हे ठश्यावरून समजते. या शिलालेखातील पुढचे अक्षर हे 'हे' असे असून याची मात्र हि ब्राम्ही लिपी मध्ये मात्रेप्रमाणे डावीकडे आडवी रेष कोरून दाखवलेली आहे. तसेच तिला खाली अजून एक उभी रेष देखील दाखवलेली आहे. या लेखामध्ये 'भैरव' या शब्दामधील 'भ' हे अक्षर ज्या पद्धतीमध

Share the post

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×