Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कंपासपेटी

    


कदाचित कंपासपेटी हा शब्द ऐकायला जरा विचित्र वाटतो, त्याचं कारण म्हणजे हल्ली लोकं पाऊच वापरतात आणि मी सेमी मधला असल्याने सगळे शब्द अर्धवट करायची सवय आहे, त्यामुळे सध्या तरी कंपासपेटीच म्हणूया!!
    
तर आमच्या शालेय जीवनातील हा एक अविभाज्य घटक!! ज्या वस्तूशिवाय आपले बालपण कधीच पूर्ण झाले नसते!! मला अजूनही आठवतं आहे, आमच्याइथे भगवानदास नावाचे एक दुकान होते, कदाचित गावातील शाळेच्या गोष्टी मिळणारे एकमेव दुकान! तर पहिली दुसरीत असताना सगळ्यांच्याकडे त्या प्लास्टिक च्या कंपासपेट्या असायच्या.. त्यात पण वेगवेगळे प्रकार असायचे! त्यादिवशी मला वह्या घ्यायच्या होत्या म्हणून दुकानात गेलो होतो तर तिथे अगदी नवीन कोऱ्या पेट्या मांडून ठेवलेल्या होत्या आणि माझ्याकडे जी होती त्यात जेमतेम २-३ पेन्सिली, एखादी पट्टी, खोडरबर आणि टोकयंत्र इतकाच काय ते मावायचं.. खरं तर याच गोष्टी भरपूर झाल्या पण शाळेत सुद्धा डबल डेकर कंपासपेटीची क्रेझ आली होती, त्यामुळे अस्मादिकांकडे पण त्याच प्रकारची पेटी आली. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत नेऊन हवा करायची असे ठरवले.

    घरी आल्यावर ती व्यवस्थित भरली! कंपासपेटी भरायची सुद्द्धा एक कला असते.. बरोबर ३-४ समान टोक असलेल्या पेन्सिली, त्या पण नटराज का अप्सरा हा वाद आपण नंतर पाहू. त्याच्यासोबत किमान पांढरे दिसणारे खोडरबर, लांब किंवा आखूड टोकयंत्र आणि खालच्या कप्प्यात पट्टी (व्यवस्थित आकडे असलेली) आणि काही दिवसांनी जमा होणारे पेन्सिलचे छिलके, अगदी जपून ठेवलेले! शाळेत तरी इतकेच लागायचे! याच कंपास पेटी वर शक्तिमान, स्पायडर मॅन असे सगळे आमचे बालपणातले देव सुद्धा विराजमान झालेले असायचे. तर सगळे व्यवस्थित भरून शाळेत गेलो आणि शेजारी बसलेल्या माझ्या एका मित्राला ती दाखवली. त्याने कुत्सितपणे हसल्यासारखे केले आणि दप्तरातून त्याची नवी कोरी कंपासपेटी काढली. नुसते बटण दाबले आणि पाहतो तर काय??! तीन कप्पे? ट्रिपलडेकर!! मला म्हणजे अगदी हॅ असल्यासारखे वाटले आणि आपण अगदीच पुराणकाळात जगत आहोत असे वाटायला लागले.

पाचवीला गेल्यानंतर मात्र त्याची एवढी क्रेझ राहिली नव्हती. पुढे परत ती आली ती एकदम आठवीमध्ये गेल्यावरच!! आठवीत असताना आम्हाला टेक्निकल नावाचा एक विषय होता. म्हणजे थोडेफार Engineering चे जुजबी ज्ञान!! त्यात आम्हाला शीट्स वगैरे काढायला शिकवणार होते. (रच्याकाने, कुणा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला त्याची ABCD ची शीट काढून हवी असल्यास जरूर यावे). तर त्या शीट्स काढायला मोठे काटकोन त्रिकोण घ्यावे लागले म्हणजे जे कंपास मध्ये होते छोटे त्यांचा काही उपयोग नव्हता!! त्यामुळे आता इथे कोण भारीतल्या गोष्टी आणतो याकडे सर्वांचे लक्ष. ते काटकोन त्रिकोण काय, शीट्स ठेवायला ती नळी काय, काही विचारू नका!!


एकंदरच कायम भरलेल्या असणाऱ्या कंपासपेटीमध्ये बऱ्याचगोष्टी जरी निरर्थक वाटत असल्या तरी त्या तशाच लागतात अन्यथा बाकी गोष्टींना मजा येत नाही. आयुष्याचे सुद्धा तसेच आहे की!! काही माणसे आपल्या आयुष्यात का आहेत हेच कळत नाही! पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे जर कळले तर मात्र तीच माणसे नेहमी मदतीला हजर असतात आणि ती जर माणसे नसतील तर आयुष्यात सुद्धा मजा नाही


असे सर्व भरलेले पहिले की मन कसे प्रसन्न होते 



This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

कंपासपेटी

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×