Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासद काय म्हणतो

फोटो- साभार गुगल 

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा तसा अकालीच झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. पण सभासद वर्णन करतो की जाता जाता सुद्धा हा थोर मनुष्य आपल्यानंतर कसे वागा असे सांगून गेला. सभासद या प्रसंगाचे संपूर्ण वर्णन करतो. तो सांगतो की शिवाजी राजाने आपल्या सर्व जवळच्या व्यक्तीना  बोलावून घेतले. त्यांची नावे सुद्धा तो देतो. सभासद बखरीमध्ये शिवाजी राजांच्या मृत्यू बद्दल येणारे वर्णन खालील प्रमाणे- 

मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वाराची जाहाली. राजा पुण्यश्लोक. कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यांमध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले. बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ. राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले. हे गड, कोट व लष्कर पागा ऐसे मेळविले, परंतु मज माघारे हे राज्य संरक्षण करणार ऐसा पुत्र दिसत नाही. कदाचित धाकटा कुवार राजाराम वाचला तर तो एक हे राज्य वृद्धी ते पाववील. संभाजी राजे वडील पुत्र जाणता आहे, परंतु बुद्धी फटकळ आहे. अल्पबुद्धी आहे. त्यास काय करावे. आपण तो प्रयाण करतो. तुम्ही कारकून व हुजरे मराठे कदीम या राज्यातील आहा. तुम्हास या गोष्टी कळल्या असाव्या. मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वाराची जाहाली. राजा पुण्यश्लोक. कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यांमध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले. बितपशील - असे मातबर लोक जवळी बोलावून आणिले. मग त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे.' म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे. मग राजियाचे कलेवर चंदनकाष्टे व बेलकाष्टे आणून दग्ध केले. स्त्रिया राजपत्न्या, कारकून व हुजरे सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तरक्रिया कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजी वेळेस नाहीत, याजकरिता धाकट्यांनी क्रिया केली. राजा साक्षात् केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. अदलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोंगलाई ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पादशाह असे जेर जप्त करून, नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती जाहाला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही. असे वर्तमान महाराजांचे जाहाले. कळले पाहिजे.

सभासद ने वर्णन केलेल्या शेवटच्या परिच्छेदात महाराजांची थोरवी आणि योग्यताच दिसून येते. याशिवाय इतरही अनेक साधनांमध्ये शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल उल्लेख केलेला दिसून येतो.


याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात  सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र,

Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it's said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.

महाराज गेल्यामुळे स्वराज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली परंतु मराठ्यांचा तो धगधगता अग्नीकुंड पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई, शाहू महाराज आणि सर्व पेशवे व अनेक मराठा सरदार यांनी सुरु ठेवला आणि महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य हे उभे राहिले. 


This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासद काय म्हणतो

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×