व्यथा माझी कथा माझी तुझ्या बाहूंत संपावी फुले काही कळ्या काही चिता माझी सुगंधावी ... तुझे आकाश ता-यांनी असे बहरून आलेले पुन्हा ही कोर अन् खाली जरा क्षितिजा लवंडावी ... तुला मी साद घालू का तुला उमजेल हे सारे तुला स्मरण्यात केवळ का इथे ही रात्र रंगावी ? जुने काही नवे काही उखाणे तूच घालावे तुझ्या माझ्यातली कूटे क्षणी एकाच भंगावी ... असे जगणे असे झुरणे कितीदा अन् रिते उरणे तुझ्या