सांगता मी कथा अपुली तिची होते विराणी दोष माझा तुझा होतो कसा हा सांग राणी ?हाय दुनियेस या चढते नशा दुःखात माझ्या झिंगते ती कशी येता जरा डोळ्यात पाणी !टाकुनि जे मला गेले कधी येती छळाया मांडला खेळ का सोडून हा जाते कोणी ? रात्र ही काजळी केव्हातरी संपेल आताबोलते ही हवा का सांगते ती रातराणी ? भासते ही जशी क्षितिजावरी रेषा एकजीवनाची कथा लिहिते कुणी एकाच पानीसूर साधू किती सांधू किती शब्दांस आता श्वास