हे या महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे. काही वर्षांपूर्वी स्वानुभवातून, माझ्या वाचनातून आणि माझ्या गुरूस्थानी असलेल्या अनेकांकडून मिळालेल्या प्रेरणेतून काही विचार मंथन करून मी एक्स्प्रेशन लॅब ही माझी अशी नाट्य-प्रशिक्षण पध्दत सुरू केली. मी काही फार क्रांतीकारी शिकवतो असा माझा नक्कीच दावा नाही. माझे विद्यार्थी मात्र माझ्याशी सतत जोडलेले राहातात. सतत मला काही ना काही विचारतात. मला त्यांच्यापैकी