Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कोविडच्या धक्क्यातुन व्यवसाय सावरण्यासाठी फ्रँचायझिंग

छोट्या आणि मोठ्या व्यवसायात एकमेकांना पूरक होण्यासाठी फ्रँचायझिंगचा वापर फार काळापासुन होत आला आहे. फ्रँचायझिंगमुळे छोट्या व्यवसायांना नव्या तसेच मोठ्या बाजारपेठेत शिरकाव मिळतो आणि त्यासह त्यांची दृग्गोचरता तसेच नफाही सुधारतो.

तर मोठ्या कंपन्यांना हे मॉडेल वापरुन त्यांचा परिचालन खर्च कमी करता येतो, त्यांच्या मूलभूत कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रीत करता येत आणि सध्याच्या तसेच नव्या बाजारपेठेतही शिरकाव करता येतो. कोविड-१९ महामारी एक अशी आणीबाणी आहे ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि व्यवसायांवरही प्रभाव पडला आहे.

पण ह्यात जाण्यापूर्वी हे फ्रँचायझिंग व्यवसाय मॉडेल कसे काम करते ते आपण प्रथम समजुन घेऊयात. फ्रँचायझिंगमध्ये फ्रँचायझर, फ्रँचायझीला त्यांच्या वतीने व्यवसाय चालविण्याचा, दोघांच्यात झालेल्या अनुमोदनाच्या चौकटीप्रमाणे आणि कराराने बांधील असलेला परवाना किंवा अधिकार, देतो. फ्रँचायझिंगची चार महत्वाची मॉडेल्स आहेत:

  • सीओएफओ (Company Owned Franchise Operatedमालकी कंपनीची, चालविणारा फ्रँचायझी)
  • एफोएफओ (Franchise Owned Franchise Operated – मालकी फ्रँचायझीची, चालविणाराही फ्रँचायझी)
  • एफओसीओ (Franchise Owned Company Operated – मालकी फ्रँचायझीची, चालविणार कंपनी)
  • एफआयसीओ (Franchise Invested Company Operated – भांडवल फ्रँचायझीचे, चालविणार कंपनी)

उदा. एखाद्या कपड्याच्या दुकानास व्यवसाय वाढवायचा असेल तर, ते एखाद्या नामांकित ब्रँडकडुन फ्रँचायझी परवाना घेतात (नामांकित ब्रँड = फ्रँचायझर, कपड्याचे दुकान = फ्रँचायझी) आणि त्या फ्रँचायझरच्या ब्रँड नावाखाली स्वत:च्याच दुकानात कपडे आणि शिलाईची सेवा पुरवितात. अशा व्यवस्थेत, फ्रँचायझरने त्यांच्या फ्रँचायझी दुकानासाठी नमुद केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे एकुण व्यवसायाची ठेवण आणि मानक कार्यप्रणाली राखणे हे फ्रँचायझीचे कर्तव्य असते.

आता फ्रँचायझर – फ्रँचायझी नाते कसे बनते ते समजुन घेतल्यावर पुढे पाहुयात कि सध्या चालू असणार्‍या कोविड-१९ महामारी आणीबाणीच्या काळात व्यवसायाला ह्याचा फायदा कसा होऊ शकतो.

भांडवल सामायिक होते

अर्थव्यवस्था वापरावर चालते आणि लॉकडाऊनमुळे लोकांकडे तर खर्चायला पैसे नाहीत. किराणाभुसार आणि मेडिकल दुकाने सोडली तर सर्वच दुकाने बंद झालेली. ह्यामुळे बहुतेक सर्वच व्यवसायात मालाला मागणीच नाही, त्यामुळे विक्रीही नाही आणि त्यामुळे नगदही येत नाही ह्याने व्यावसायिक हैराण झालेत. अशा कमी होत चाललेल्या, आर्थिक कार्ये आणि व्यावसायिक नफा, यामुळे लॉकडाऊन नंतरच्या काळात उद्योजकता आणि व्यवसाय विस्तारासाठी नविन किंवा ताज्या भांडवलाची गरज भासू लागली आहे.

कोणत्याही व्यवसायाला वाढण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी महामारीच्या आणीबाणीमुळे गरजेचे मूलभूत भांडवलच नसणे ही फारच मोठी समस्या भेडसावत आहे. तर दुसर्‍या बाजुला वित्तीय संस्था आणि निवेशकांना व्यवसायासाठी दिलेल्या निवेश कर्जावरील परतावा मिळण्याचा असंभव घाबरवत आहे. 

ह्या अशा अंधार्‍या काळात व्यवसाय आणि उद्यमींच्या व्यवसाय वाढ आणि विकासासाठी सीओएफओ मॉडेलच्या फ्रँचायझींगने आशेचे किरण दिलेले आहेत.

ब्रँड पावरचा वापर

लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात, कमी दृग्गोचरता किंवा ग्राहकांची ब्रँडविषयीची जागरुकता कमी असणार्‍या किंवा जरुरी हिकमत नसणार्‍या छोट्या ब्रँडच्या तुलनेत मोठ्या ब्रँडना, सावरणे सोपे जाते. मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळ्या आणि वितरण नेटवर्क, लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधा, वित्तीय ताकद तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे ब्रँड मूल्य ह्या सर्व क्षमतांमुळे मोठ्या कंपन्या, स्थानिक छोट्या व्यवसायाना आपल्या छायाछत्राखाली घेऊ शकतात. उदा. रिलायंस जियो मार्ट त्यांचे तंत्रज्ञान वापरुन मुंबईच्या उपनगरातील किराणाभुसार मालाच्या दुकांनांच्या मोठ्या नेटवर्कशी जुडु शकतात.

सोयीस्कर फ्रँचायझिंग अनुमोदन कराराद्वारे छोटे व्यवसायही मोठ्या ब्रँडबरोबरच्या सहयोगाने त्यांचा व्यवसाय चालू ठेऊ शकतात. छोट्या कंपन्यांशी जुडलेल्या मोठ्या ब्रँड आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा फायदा छोट्या कंपन्यांना तर होतोच पण त्याद्वारे मोठ्या कंपन्याही स्थानिक बाजारपेठेत शिरकाव करु शकतात.

फ्रँचायझरच्या नैपुण्य आणि अनुभवाचा फायदा घेणे

फ्रँचायझरच्या समान प्रकारच्या व्यवसाय हाताळणीतील नैपुण्य आणि समान उद्योगात कंपनी चालविण्याचा अनुभव ह्यामुळे, फ्रँचायझीला व्यवसायाची चौकट चटकन बसविण्यात आघाडी मिळते.

तसेच फ्रँचायझीजचे, सुरवातीपासुन नविन पुरवठा साखळी चौकट तयार करण्याचे कष्ट आणि वेळही वाचतो.

ईच्छुक उद्यमींना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची संधी फ्रँचाइझ व्यवसाय विकसन योजना मंचाद्वारे मिळते.

मानव पुनर्संसाधन

लॉकडाऊन काळानंतर बेरोजगारीचे मोठेच संकट आर्थिक व्यवस्थेसमोर आहे. कमी झालेल्या व्यवसाय कार्यकलापांमुळे मानव संसाधनाची गरजही कमी होते. व्यावसायिक समुदायासमोर ह्या निष्क्रिय मानव संसाधनाची समस्या उभी आहे.

फ्रँचायझिंग मार्गाने व्यवसायाची गाडी परत रुळावर आणण्याची संधी मिळत आहे. अशा वाढीव व्यवसाय कार्यकलापामुळे मानव संसाधनाची गरज परत भासेल आणि भेडसावणारी बेरोजगारीही कमी होईल.

जोखीमांतुनही फायदा उचलणे

वापराची मागणी कमी झाल्याने, कोविड आणीबाणीच्या काळात आणि नंतरही सद्य व्यवसाय चालविण्याची किंवा विस्तार करण्याची जोखीम फारच वाढीव आहे. जेव्हा सद्य व्यवसायच हाता-तोंडाची मिळवणी करण्यात धडपडत असतात तेव्हा फ्रँचायझिंग मॉडेल्स त्यांना सावरण्यात आणि परत उभे रहाण्यासाठी बळ देतात. दुर्दैवाने काही व्यवसायात आधीच झालेल्या भरपूर नुकसानामुळे सावरण्यास थोडा वेळ लागतो. अशा परिस्थितीत बाजारपेठेतही फारच थोडे लोक असे असतील जे त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी काम करत असतील आणि बहुधा त्यांनाही मोठ्या बाजारपेठेस पुरवठा करावा लागत असणार. 

चांगल्या सुसंबद्ध रिटेल फ्रँचाइझ व्यवसाय योजनेमुळे फ्रँचायझरचे सद्य पुरवठा साखळी नेटवर्क, फ्रँचायझी व्यवसायासाठी उपलब्ध असते.

कोविड आणीबाणीच्या काळातही, काही आवश्यक वस्तुंची ब्रँडेड दुकाने सर्व वस्तुंचा पुरवठा करु शकतात जेव्हा त्याच सर्व वस्तुंची नियमित छोटी दुकाने किंवा स्थानिक सुपरमार्केटस मात्र त्याच वस्तु मिळवु शकत नाहीत. ब्रँडेड दुकानांना हे शक्य झाले कारण त्यांची मजबुत पुरवठा साखळी आणि मोठया नेटवर्कची क्षमता. ह्याचसाठी फ्रँचाइझ मॉडेल व्यवसाय योजनेसह विक्री तसेच बाजारातील हिस्सा कमी होण्याची जोखीमही कमी होते.

डिजिटल व्यापारासाठी चांगली संधी

छोटे व्यवसाय ज्यांनी डिजिटलवर आपली उपस्थिती नोंदविण्याचा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक होण्याचा विचारही केला नव्हता ते आज गरज म्हणुन ह्या माध्यमाकडे पाहू लागले आहेत, कारण तेच भविष्य असणार आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा व्यवसाय चालविण्यातील एक महत्वाचा पैलू आहे. तंत्रज्ञान हे फक्त सक्षमीकरण करत नाही तर व्यवसायाचा प्रभाव आणि कार्यक्षमताही सुधारते. छोट्या उद्यमांना, इकॉमर्स वेबसाईटस चालु करुन त्यांच्या आयटी प्रणालीत कार्यप्रणालीचा समावेश करण हे कधीच सोप नव्हत. पण फ्रँचायझिंग आणि स्पष्ट रुपरेषेसहच्या फ्रँचाइझ व्यवसाय विकसन योजनांमुळे फ्रँचायझरचे सद्य डिजिटल तसेच तंत्रज्ञानविषयक नेटवर्क आणि सुविधा ह्यांचा वापर फ्रँचायझी व्यवसायही करु शकतात. 

ह्या लेखात चर्चिलेले विविध दृष्टीकोन ध्यानात ठेवल्याने, लॉकडाऊन काळानंतर उदयास येणार्‍या फ्रँचायझिंग संधी ह्या फक्त जिंकण्याचेच समीकरण देतील. पण फ्रँचाइझ व्यवसाय विकसानासाठी जोमदार योजना आणि स्पष्ट मार्ग आखलेला हवा.

आमच्याबाबत

युवर रिटेल कोच (वायआरसी) ही एक भारतीय रिटेल कंसल्टिंग आणि आऊटसोर्सिंग कंपनी आहे जी रिटेल ऑफलाईन, रिटेल इकॉमर्स आणि रिटेल ऑम्निचॅनेल द्वारे विविध उद्योगांना विस्तृत श्रेणीच्या सेवा पुरविते.

संबंधित ब्लॉग्ज

भारतातील उच्च कोटीच्या आऊटसोर्सिंग कंपन्या

आपल्या व्यवसायास संघटित करण्यासाठी सोपी मोफत टूल्स

एसोपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर = मानक कार्यप्रणाली) काय आहे?

तग धरण्यासाठी बदल

The post कोविडच्या धक्क्यातुन व्यवसाय सावरण्यासाठी फ्रँचायझिंग first appeared on Your Retail Coach.


This post first appeared on Management Consulting Company, please read the originial post: here

Share the post

कोविडच्या धक्क्यातुन व्यवसाय सावरण्यासाठी फ्रँचायझिंग

×

Subscribe to Management Consulting Company

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×