Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतानाचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होण्यास फार अवधी लागत नाही. त्यातही तो फोटो किंवा व्हिडीओ एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा किंवा सेलिब्रिटीचा असेल तर वाऱ्याच्या वेगाने तो पसरतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेता सनी देओलचा आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओलची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. कारण मुंबईतील जुहू सर्कल परिसरात तो चक्क मद्यधुंद अवस्थेत पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध तो अडखळत चालतोय आणि अचानक एक रिक्षाचालक त्याच्या मदतीला येतो. हा रिक्षाचालक सनीला त्याच्या रिक्षामध्ये बसवतो आणि हे सर्व घडत असताना तो मद्यधुंद अवस्थेतच असल्याचं पहायला मिळत आहे.

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतानाचा व्हिडीओ समोर

सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सनी पाजी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर का फिरत आहेत’, असा सवाल एकाने केला. तर ‘कदाचित हा डीपफेक व्हिडीओ असू शकतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बॉबीच्या यशाचा सदमा असेल’, अशी उपरोधिक टिप्पणीही नेटकऱ्यांनी केली.

Drunk Sunny Deol Roams On Mumbai Streets Seemingly Unstable Manner What Is The Truth



This post first appeared on Digital Marketing Company India, Web Designing Services Chennai, please read the originial post: here

Share the post

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतानाचा व्हिडीओ समोर

×

Subscribe to Digital Marketing Company India, Web Designing Services Chennai

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×