Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

दडपे पोहे (Dadpe Pohe)

सामग्री, १५ मिनट, २  लोगों के लिए

अर्धी वाटी खवलेला नारळ

एक कांदा मध्यम आकाराचा चिरून

एक छोटा चमचा जिरे

एक छोटा चमचा लिंबू रस

एक छोटा चमचा साखर किंवा गुळ

एक मोठा चमचा तेल

एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यात कापून

कोथिंबीर बारीक चिरून

चवीपुरतं मीठ

चार-पाच कढीपत्त्याची पाने

दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे

दोन वाट्या पातळ पोहे

पाव वाटी नारळाचं पाणी

प्रक्रिया :

दोन वाट्या पातळ पोहे एका बोल मध्ये घ्यायचे.आता त्यात एक मध्यम चिरलेला कांदा ,बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सार ओले खोबरे, गूळ किंवा साखर,चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं.थोडं थोडं नारळाचं पाणी घालून हे पोहे आणि घातलेले अन्न जिन्नस छान एकत्र कालवून घ्यायचे .पाणी खूप घालून काला करायचा नाही नारळ पाणी नसेल तर साधे पाणी वापरलं तरी चालेल.असे हे मस्त कालवून झाले की पोहे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे तोपर्यंत फोडणीची तयारी करायची.

फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं.त्यात कच्चे शेंगदाणे घालायचे. दोन ते तीन मिनिटं कच्चे शेंगदाणे तेलात मस्त फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायचे.त्यात एक छोटा चमचा जीरे टाकायचं. मस्त फुललं की त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकायचा.आता ही फोडणी आपल्या दडपलेल्या पोह्यांवर ओतायची.एका चमच्याच्या साह्याने हे दडपे पोहे एकत्र करायचे. चव बघायची मीठ साखर काही कमी वाटलं तर आत्ताच टाकून घ्यायचं.

खाताना मस्त लिंबू पिळून संध्याकाळचे छोट्या भुकेसाठी खायला द्यायचं.

तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे

शिजण्यासाठी लागणारा वेळ: ५ मिनटे

वाढणी: २-३’ जणांसाठी

(Note Want Earn Money Click Below Link)https://wintub.com/?r=8694843

Want to Earn Money Click Here



This post first appeared on 2yumm Recipes, please read the originial post: here

Share the post

दडपे पोहे (Dadpe Pohe)

×

Subscribe to 2yumm Recipes

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×