Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

काय आहे जॉर्ज फ्लोईड प्रकरण, अमेरिकेत का भडकल्यात दंगली ?

सध्या अमेरिकेत सुरू झालेल्या दंगलीचे कारण जरी पोलिसांनी भर रस्त्यात दिवसा ढवळ्या जॉर्ज फ्लोईड या तरुणाची हत्या हे असले तरीही त्याची पार्श्वभूमी तेवढीच नाही. गेल्या 2-3 वर्षांपासून पोलिसांकडून सतत कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय झाला आहे. हे तुम्ही कुठल्याही न्युज वेबसाईट, सोशल मीडिया वर सहज बघू शकता. आत्ता फक्त त्याला कारण मिळालं आणि उद्रेक झाला इतकंच. पोलिसांनी कृष्णवर्णीय लोकांना विनाकारण गोळ्या घालून मारले आहे आणि कोर्टात मृत व्यक्ती विरोधात काहीही सिद्ध होऊ शकले नाही तरीही यामध्ये चूक असलेल्या पोलिसांना मागच्या दाराने परत ड्युटी वर घेण्यात आले.

मिनियापोलिस या शहरात मागील आठवड्यातजॉर्ज फ़्लोईड या कृष्ण वर्णिय माणसाला पोलिसांनी अटक केली. (कांहीतरी गुन्हा घडलाअसावा-मला कारण माहित नाही) ती करतांना झालेल्या झटापटीत अटक करणा-या एका गो-या पोलिस अधिका-याने जॉर्जला त्याच्यापायाने जवळ जवळ साडेआठ मिनिटे दाबुन ठेवले होते. पायाखाली दाबल्या गेलेल्या जॉर्जचीमान आवळली जाऊन तो “I cant Breath”, “मला श्वास घेता येत नाही, मला श्वास घेता येत नाही” अशी तक्रार करीत होता मात्र पोलिस अधिका-याने त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर जॉर्ज मरण पावला. त्यावेळी अटक करणा-या पोलिस अधिका-याबरोबर इतरही तीन अधिकारी होते. हे सर्व घडत असतांनात्या तिघांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली होती असे व्हिडिओ वरुन दिसते. हा व्हिडिओ (ज्याकुणी घेतला होता) तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा गांवोगांवी कृष्णवर्णीयविरुद्ध गोरा हा वाद निर्माण झाला.

   

निदर्शने चालू झाल्यावर सुरवातीला सर्व शांततामय मार्गाने चालू होते पण काही कारणाने कुठेतरी ठिणगी पडली आणि कुठल्यातरी शहरातील आंदोलनकर्त्यानी थेट पोलीस स्टेशन पेटवून दिले. हे लोण इतर ही पसरले आणि पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ सुरू झाली. हे कमी होते म्हणून एका ठिकाणी समाजकंटकांनी लोकांनी आंदोलन कर्त्यांवर चक्क गाड्या चालवल्या. एका ठिकाणी पोलिसांनी देखील हेच केले. हे देखील कमी होते म्हणून काही समाजकंटकांनी दुकानांच्या काचा फोडल्या आणि दुकाने लुटायला सुरुवात केली. लुटनाऱ्यांमध्ये फक्त कृष्णवर्णीय लोक होते असे नाही तर ज्यांना संधी मिळाली ते सर्व माल उचलून पसार झाले.

मिनियापोलिसच्या पोलिसडिपार्टंमेंटने त्या चारही पोलिसांना कामावरुन काढुन टाकले व ज्या पोलिसाने जॉर्जलादाबुन ठेवले होते त्याला अटकही केली. मात्र लोकांची मागणी आहे की ऊरलेल्यापोलिसांना देखील अटक झाली पाहिजे.

गेल्या 2 दिवसांपासून अमेरिकेतल्या काही शहरामध्ये रोज संध्याकाळी 6 ते सकाळी 6 कर्फ्यु लावला आहे तरीही लोक बाहेर येऊन लूटमार करत आहेत. काही माथेफिरू लोकांकडून गोळीबार होत असून अजून पोलिसांकडून गोळीबार झाल्याची घटना नमूद झालेली नाही.

काही ठिकणी पोलिसांनी अश्रू धूर, पेपर स्प्रे, रबर बुलेट चा वापर करुन गर्दी पांगवन्याचा पर्यटन चालू आहे. आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकारांना देखील शिवीगाळ झाली आहे.

The post काय आहे जॉर्ज फ्लोईड प्रकरण, अमेरिकेत का भडकल्यात दंगली ? appeared first on गर्जा महाराष्ट्र.



This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

काय आहे जॉर्ज फ्लोईड प्रकरण, अमेरिकेत का भडकल्यात दंगली ?

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×