Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

गप्पा

खूप लिहावसं वाटतंय.. पण विचारांची इतकी गर्दी झालीये डोक्यात कि नक्की कोणता विचार Overtake करून आधी कागदावर उतरवायचा तेच कळत नाहीये. कागदावर उतरवायला कागद आहे कुठे हातत. Computer  वर type  करत्ये नाही का मी. कसं झरझर बदललय ना जग. आत्ता आत्ता पर्यंत डायरी लिहायची सवय होती मला. आधी साधी वही, मग ती कोणीतरी वाचेल या भीतीने अगदी कुलुपाची वही (ज्याची चावी अजून सांभाळून ठेवली आहे मी) आणि आता चक्क डिजिटल डायरी.
आजही लिहायला वेळ, इच्छा, साधन, सगळ काही आहे. पण मग घोड पेंड खातंय कुठे? जरा विचार केला आणि काही गोष्टी उलगडत गेल्या.
Perfectionist या concept मुळे  बदललय का सगळं ? परवा बाबा बोलता बोलता म्हणाले, " Perfection चं  नंतर बघू, आधी बनव तर खर." पटलं  मला! आजकाल सगळ्या गोष्टी brodcast  करायची सवय लागल्यामुळे जोपर्यंत एखाद्या गोष्टीला लोकपसंती  मिळेल याची खात्री आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीत हातच घालत नाही. पण जर नुसते मनातच मांडे खात बसलो तर अख्खं  आयुष्य मनातल्या मनातच नाही का जगावं  लागणार\? म्हणून आज ठरवल; जे, जसं, ज्या वेगात मनातून बाहेर पडेल तसं  पडू द्यायच. कुठेही, cut  copy  paste  edit  करायचं  नाही. बघू तरी माझ्या मनाला नक्की म्हणायचं तरी काय. बरेच दिवस झाले माझ्या मनाशी गप्पाच नाही मारल्या मी. सगळ साठत गेलं…  मनातल्या मनात. खूप जड जड वाटायला लागलं अचानक. सगळा भार कोणासमोर तरी हलका करायचा होता.  पण प्रत्येक जण  स्वतःचीच ओझी वाहत होता. आणि जरी सापडलं असतं कोणी रिकामं; वेळेने आणि मनाने, तरी  बोलायचं काय  हे कुठे ठाऊक होत. मग मनाची सगळी दर उघडी केली आणि या laptop समोर मोकळी झाले. इतके दिवसाच्या अवास्तव पसाऱ्यामुळे आत आत कुठेतरी दडल्या गेलेल्या कविता, लघुलेख आता हळू हळू बाहेर येतील बहुदा. त्यांना वाट जी मोकळी करून दिली आहे अत्ता. कसं गार गार वाटतंय.

पौर्णिमेच्या चांदण्यात माळरानावर उभं राहून वाऱ्याचा आवाज ऐकल्यासारखं. 


This post first appeared on पालवी, please read the originial post: here

Share the post

गप्पा

×

Subscribe to पालवी

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×