Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

फक्त मनात पावसाळा


एकटक पाहत असे
भरून आलेल्या आभाळा,
आता फक्त राहिलाय
आठवणीत पावसाळा
एका थेंबाने धरेची
शमलेली काहिली,
पावसाची ती पहिली सर
मनातच राहिली
खिडकीतून दिसणारा
सरी पानांचा फेर,
आठवताना मात्र माझ्या
फक्त उष्णता चौफेर
सरसर धारा तिथे
झुगारत असतील उन्हाळा,
वाळवंटी देशात माझ्या

फक्त मनात पावसाळा!


This post first appeared on पालवी, please read the originial post: here

Share the post

फक्त मनात पावसाळा

×

Subscribe to पालवी

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×