Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Ipl 2023 Dc Vs Csk 1st Innings Chennai Super Kings Won Delhi Capitals By 77 Runs – Coursereview


DC vs CSK, IPL 2023 : साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 77 धावांनी विराट पराभव केला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकानंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. चेन्नईने दिलेल्या224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीला 14 सामन्यात नवव्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीची यंदाच्या हंगामातील सुरुवात आणि शेवटही निराशाजनक झाला.  

चेन्नईचा प्लेऑफमध्ये प्रवेश

दिल्लाचा पराभव करत धोनीच्या चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नईने 14 सामन्यात 17 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला आठ सामन्यात विजय मिळालाय. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा चेन्नई दुसरा संघ आहे. याआधी गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चेन्नई सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर चेन्नईने दुसरे स्थान अवलंबून आहे. लखनौने कोलकात्याचा विराट पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो.. अशात लखनौ आणि कोलकाता यांच्यामध्ये क्वालिफायर एक सामना होईल. लखनौने कोलकात्याचा पराभव केल्यास.. चेन्नई आणि लखनौ यांच्यात समान गुण होतील.. अशात नेट रनरेटच्या आधावर क्वालिफायर एक मध्ये प्रवेश मिळेल. 

दिल्लीचा दारुण पराभव – 
चेन्नईने दिलेल्या 224 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला. पृथ्वी शॉ याने फक्त पाच धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर साल्ट आणि रुसोही लगेच तंबूत परतले. दीपक चाहर याने या दोघांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार डेविड वॉर्नर याने  एक बाजू लावून धरली होती. वॉर्नर याने 86 धावांची एकाकी झुंज दिली. साल्ट 3, रुसो 0 धावांवर बाद झाले. यश धुल 13 आणि अक्षर पटेल  याने 15 धावांचे योगदान दिले. अमन खान सात तर ललीत यादव सहा धावांवर बाद झाले. कुलदीप यादव शून्यावर बाद झाला. डेविड वॉर्नरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.

  डेविड वॉर्नर याने एकाकी झुंज दिली. वॉर्नर याने 58 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नर याने पाच षटकार आणि सात चौकार लावले. पथिराणा याने वॉर्नरची खेळी संपुष्टात आणली. वॉर्नर याने एका बाजूने दिल्लीचा डाव सावरला. 

चेन्नईकडून दीपक चहर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. दीपक चाहर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. महिश तिक्ष्णा आणि पथिराणा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 



This post first appeared on Coursereview, please read the originial post: here

Share the post

Ipl 2023 Dc Vs Csk 1st Innings Chennai Super Kings Won Delhi Capitals By 77 Runs – Coursereview

×

Subscribe to Coursereview

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×