Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

` ढाक बहिरी ` - भ्रमंती !

          वर्षाअखेरीस रॉक ऑन ट्रेक टू ढाक बहिरी या मथळ्याखाली  गिरीदर्शन चे ई पत्र येऊन धडकले होते. नवीन वर्ष , नवी उमेद घेऊन ढाक बहिरी ला भ्रमंती करायचे ठरवले.दोन दिवसाचा हा ट्रेक फुलटू धमाल आहे असे बऱ्याच ठिकाणी वाचनात आले होते.मग काय शनिवारी दुपारी शिवाजीनगरहून रपेट सुरु झ्हाली. गिरीदर्शन आणि आम्ही साधारण ४० टाळकी असू. लोकल ने कामशेत गाठले त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते. कामशेतहून जांभिवली असा पुढचा प्रवास होता.अर्धा तास वाट पाहूनही एस.टी आली नाही.मग तरकारी एक्ष्प्रेस्स म्हणजे जीप आपलीशी वाटू लागली. या तरकारी एक्ष्प्रेस्स मधून जांभिवली ला पोहोचलो. सात वाजले होते.

अग्निदिव्य
          सर्वांनी आपापली रात्रीची सेटल मेंट करयाला सुरुवात केली. गावातच शाळेच्या व्हरांड्यात आम्ही जागा धरून ठेवल्या, आणि इकडे तिकडे फिरू लागलो.थंडी हळूहळू जाणवायला लागली होती. रात्री नऊ वाजता शाळेमागील मोठ्या कट्ट्यावर एकत्र जेवणाचा आनंद लुटला. त्यानंतर कॅम्पफायर करण्यात आला. मध्य रात्री पर्यंत शेकोटी शेजारी बसून सर्वांनी आपले मन मोकळे होईस्तोवर गाणी गायली.

          सकाळी पाच वाजता उठून नाश्ता आटोपून ढाक स्वारी प्रारंभ झ्हाली ती गिरीदर्शनच्या घोषणेने.सर्व भलत्याच उल्हासात होतो. तासाभरात पहिल्या घाटमाथ्यावर येऊन पोहोचलो. सर्वांनी आपापली इंट्रो दिली. नवीन टाळक्यांच्या ओळखी झ्हाल्या. जुने मित्र होतेच . पुणेकर ९९ टक्के , अणि एक रत्नागिरिहून आला होता ख़ास ट्रेकिंगला.
त्यानंतर लगेचच ढ़ाक कड़े कूच केली.

ढ़ाक
          मध्यान्हपूर्वी श्री बहिरी देवाच्या गुहेत पोहोचायचे होते,कारण दुपारी चढ़निचा खड़क तापतो कडक. जाताना विरळ जंगलातून वाट काढत नळी पासून येउन पोहोचलो त्यावेळी नऊ वाजले होते. नळी हा एक चिन्चोला भाग आहे जो ढ़ाक आणि कळकराय ला मुक्त करतो. नळीतुन उतरताना रोपची मदत घ्यावी लागली. उतरून आल्यावर गुहेचे दर्शन जहाले. तिथून जो नजारा दिसला तो अवर्णनीय.
" खड़ा खड़क तो उभा ताठ , बघुनी त्याकडे होई पुरेवाट "

 
मानाचा
          काही दुर्गमित्रानी या कड़ेकपारित हूक्स लावल्याने थरारक ट्रेक्चा अनुभव घ्यायचा असेल तर ढ़ाक एकदा जरुर करा. याच हूक्स आणि त्याला रोप टाय करून प्रस्तरारोहनास सुरुवात केली. गरिबांचा मदनच हा जणु. उभे कड़े असल्याने सर करताना जाम मजा आली .नाश्ता दाबुन ज्हाला कारणाने पोटातली कावळी शांत तर न्हवती , पण त्यांची कावकाव गुहेतील थंडगार पानी पिउन शांत जहाली काही काळ.


 
चला
          याच गुहेत श्री बहिरी देवाचे छोटे मंदिर आहे.देवाचा आशीर्वाद घेऊन काही काळ गुहेतच विश्रांती घेतली.हीच गुहा दोन भागात वाटलेली आहे. एका गुहेत मंदिर, पाण्याचे टाके आणि साधरण तीस जणांची रहायची व्यवस्था असलेली दुसरी गुहा.काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आले होते ढाकचा बहिरी देव रागीट आणि तापीटही आहे. त्याला मुली-स्त्रियां मंदिरात आलेल्या चालत नाहीत. त्याची प्रचीती त्या दिवशी आली. वर आलेय्ल्या मुलींवर,रोज ची पूजा करणारे पुजारी काका जाम चिडले .त्यांना कनविन्स केले.तर या दुसऱ्या गुहेत वर आलेल्या मुली शिफ्ट झ्हाल्या गपचूप.

 
श्री बहिरी
          गुहेतून दूरपर्यंत विस्तृत प्रदेश नजरेत भरतो.समोरच राजमाची ची जोडगोळी दिसते. उजवीकडे कर्जतचा प्रदेश दिसतो.  एक्सप्लोरर्स ची टाळकी आमच्याआधी आली होती त्याच दिवशी.राप्लिंग करून उतरणार होती. आमचाही तसाच प्लान होता. राप्लिंग या पूर्वी मी केले न्हवते.  हार्नेस, रोप, नॉटस, डीसेंड आणि काय काय !! एक्सप्लोरर्स ची सर्व जत्रा संपल्यावर राप्लिंग ला सुरुवात केली.एकावेळी फक्त एकंच.

          मी मिळून पाच जन आल्या त्याच वाटेने उतरलो. उतरतानाचा अनुभव स्वर्गीय ! कारण वर येताना लागणारा तोच चढ दुप्पटीने उतरताना अवघड गेला. चढताना आपल्याला पाय किंवा हात कोठे ठेवायचा हे डोळ्यांनी दिसते पण उतरताना उभा कडा असल्याने पायाची जागा चाचपून मगच पुढे जाता येते. गुहेतून खाली उतरलो त्यावेळी तीन वाजून गेले होते. परतिचे वेध लागले होते.

द रोक
          एव्हाना जाम भूक लागली होती आणि जाम्भवली हून शेवटची परतीची एस.टी सहा वाजता होती. खाली उतरलेल्या पैकी २० जणांची पहिली तुकडी करून जांभिवलीकडे कूच करायचे ठरले आणि आम्ही परत निघालो.दुसरी तुकडी नंतर येणार होती. तासातच जांभिवलीला येऊन धडकलो. गावात आधीच जेवणाची व्यवस्था केली होती , मनसोक्त जेवण केले.  त्यानंतर विश्रांती घेतली.

राजमाची
          अमर्याद फोटो,राप्लिंग चा थरारक अनुभव, नवीन मित्रमंडळी यांना बरोबर घेऊन जायची वेळ झ्हाल्ली होती.मग - सहाची एस.टी पकडून कामशेत. आठची लोकल पकडून शिवाजीनगर. नऊची पी.एम.टी पकडून घरी !!!
ट्रेक अरेंजमेंट बद्दल गिरीदर्शन चे मनापासून धन्यवाद. ट्रेकर्स मित्र मंडळींचे सहकार्याबद्दल आभार.


 
सुरुवात...... 


This post first appeared on अनाकलनीय, please read the originial post: here

Share the post

` ढाक बहिरी ` - भ्रमंती !

×

Subscribe to अनाकलनीय

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×