Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Besan Ladoo - बेसनाचे लाडू

सोपी, पटकन होणारी दिवाळीची गोड रेसिपी


Read Besan Ladoo in English 

साहित्य :
  • २ कप बेसन 
  • १ कप पिठीसाखर 
  • ३ - ४ वेलच्या, पावडर करून 
  • १/२ कप तूप 
  • मनुका, बदाम, काजू 
कृती:
१. कमी आचेवर १० - १२ मिनिटे बेसन कोरडेच भाजून घ्या. भाजताना सतत हलवत राहा. बेसन करपून देऊ नका. 
२. दुसऱ्या भांड्यात तूप वितळवून घ्या. १० - १२ मिनिटे बेसन भाजून झाल्यावर त्यात वितळवलेले तूप ओता आणि परत ५ - ७ मिनिटे भाजा. 
३. बेसनला छान वास येईपर्यंत भाजत रहा. बेसन सोनेरी रंगाचे होईल आणि बाजूनी तूप सोडेल. 
४. आता बेसन गॅस वरून काढून बाजूला ठेवा. 
५. ह्या मिश्रणात वेलची पावडर, पिठीसाखर आणि मनुका, काजू, बदाम घाला. एकजीव करा. 
६. मिश्रण थंड होऊ द्या. 
७. मिश्रण थंड झाले कि थोडे थोडे हातावर घेऊन छोटे-छोटे लाडू वळा. 
८. हवाबंद डब्यात लाडू भरून ठेवा. 

खूप जास्त तूप मिश्रणात ओतू नका, यामुळे मिश्रण पातळ होईल आणि लाडू नीट वळता येणार नाहीत. 





This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Besan Ladoo - बेसनाचे लाडू

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×