Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Bhajani Chakali - भाजणीची चकली

दिवाळीचा सर्वात आवडता फराळ

Read Chakali in English 
भाजणी साहित्य :
  • १ किलो तांदूळ 
  • १/२ किलो चणा डाळ 
  • १/४ किलो उडीद डाळ 
  • १/८ किलो मूग डाळ 
  • १/२ कप धने 
  • २ चमचे जिरे 
भाजणी बनवायची कृती :
१. वरील सर्व साहित्य साफ करून घ्या. 
२. मध्यम आचेवर सर्व डाळी भाजून घ्या. 
३. नंतर तांदूळ भाजा. आणि मग धने व जिरे भाजून घ्या. 
४. वरील सर्व डाळी व तांदूळ थंड होऊ द्या. 
५. थंड झाले कि एकत्र करून दळून आणा. हि झाली भाजणी. 

चकली साठी साहित्य:
  • १ काप चकली भाजणी 
  • १ चमचा हिंग 
  • २ - ३ चमचे तीळ 
  • १ कप पाणी 
  • १ चमचा लाल तिखट 
  • मीठ,चवीनुसार 
  • तेल, तळण्यासाठी 
चकली कृती :
१. कढईत थोडे तेल गरम करून भाजणीत ओता. 
२. त्यात हिंग, तीळ, तिखट, हळद, मीठ घालून वरून १ कप उकळलेले पाणी ओता. 
३. ह्याचा लवचिक व मऊ असा गोळा मळून घ्या. गरज लागल्यास कोमट पाणी वापरा. 
४. हा गोळा चकलीच्या साच्यात घालून गोल गोल चकल्या पाडा. 
५. कढईत तेल गरम करा. आता त्यात २ - ३ चकल्या सोडा. 
६. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा. 
७. कागदावर काढा म्हणजे जास्तीचे तेल शोषले जाईल. 
८. सर्व चकल्या थंड झाल्या कि घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Bhajani Chakali - भाजणीची चकली

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×