Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Raw Banana Kofta Curry - कच्च्या केळ्याची कोफ्ता करी

कोफ्ता करी साधारण सर्व घरात बनणारी, चपाती किंवा भाताबरोबर चालून जाणारी डिश आहे.

बरीच लोकं नवरात्रात आले-लसुन खात नाहीत, त्यांनी ही डिश आले-लसून न वापरता करून बघावी.

Read Raw Banana Kofta Curry in English
Read Raw Banana Kofta Curry in

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : ६ - ७


साहित्य : 

कोफ्ता
  • १/२ डझन 
  • २ चमचे बेसन 
  • मीठ, चवीनुसार 
  • १/२ चमचा गरम मसाला 
  • कोथिंबीर, बारीक चिरलेली 
  • तेल, तळण्यासाठी 
  • १ चमचा आमचूर पावडर 
करी 
  • १/४ kg टोमाटो 
  • १/४ kg कांदा 
  • १/४ चमचा हळद पावडर 
  • १/२ चमचा मोहरी 
  • १ चमचा गरम मसाला 
  • मीठ, चवीनुसार 
  • १ चमचा आले-लसून पेस्ट 
  • २ चमचे कोथिंबीर, बारीक चीरून
  •  २ चमचे  लाल तिखट 
  • २ चमचे लिंबू रस 
  • पाणी, गरजेनुसार 
कृती:
कोफ्ता
 
१. केळ्याची साले काढून घ्या. दोन्ही बाजूची टोके उडवून टाका आणि दोन तुकडे करा. कुकर मध्ये १ शिटी लावून शिजवून घ्या.
२. कुकर थंड झाल्यावर, शिजलेली केली ताटात काढून घ्या आणि थंड होऊ द्या. नंतर ती हातानी कुस्करून घ्या.
३. दुसऱ्या ताटात बेसन, मीठ, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कोथिंबीर घेऊन निट एकजीव करा.
४. त्यात कुस्करलेली केळी घालून मऊसर मळून घ्या. गरज  लागल्यास पाणी वापरा.
५. ह्या  पीठाचे छोटे छोटे ७-८ गोळे करा.
६. Gas वर कढईत तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की गोळे तेलात सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
७. सर्व गोळे टाळून झाले कि टिश्यू पेपर वर काढून घ्या.

करी :
१. टोमाटो, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्या.
२. Gas वर कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात मोहरी टाकून तडतडू द्या.
३. आता त्यात टोमाटो-कांदा पेस्ट, आले-लसून पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परता.
४. परतलेल्या मसाल्यात थोडे पाणी घाला आणि पाण्याला उकळी येऊ द्या.
५. त्यात वर तळून ठेवलेले गोळे टाकून ५ मिनिटे शिजवा.
६. Gas बंद करा.
७. तयार कोफ्ता करी भांड्यात काढून घ्या.
८. साधा भात किंवा जीरा राईस बरोबर वाढा.


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Raw Banana Kofta Curry - कच्च्या केळ्याची कोफ्ता करी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×