Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Rava Coconut Ladoo - रवा नारळ लाडू

रव्याचे लाडू ही एक अशी डिश आहे जी कोणत्याही सणाला बनवता येते. खास करून दिवाळीत असे लाडू घरोघरी बनतात.

शिका रव्याचे लाडू सोप्या कृतीत!

Read Rava-Coconut Ladoo in English
साहित्य :
  • १/२ किलो रवा (जाडा)
  • १/२ कप दुध 
  • ४ कप ओला नारलाचा चव 
  • १/२ कप तूप 
  • वेलची पावडर 
  • १/४ कप सुकामेवा 
  • केशर, चिमुटभर 
  • ३ कप साखर 
  • १ १/२ कप पाणी 
कृती:
१. जाड बुडाच्या कढईत तूप गरम करत ठेवा. त्यात सुकामेवा परतून घ्या. सोनेरी रंगाचा झाला की ताटात काढून घ्या.
२. आता त्याच तुपात, रवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
३. परतलेल्या रव्याचे २ समान भाग करा आणि प्रत्येक भागात दुध मिसळून घ्या. परत परतून घ्या.
४. त्यात ओल्या नारळाचा चव मिसळा आणि परत परता. एका ताटात काढून घ्या.
५. Gas वर कढई ठेवून पाणी उकळायला ठेवा. त्यात साखर आणि केशर घाला.
६. सतत हलवत रहा आणि दोन तारी पाक तयार करा.
७. त्यात रवा-नारळाचे मिश्रण, वेलची पावडर आणि सुकामेवा घाला. सतत हलवत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
८. मिश्रण थंड होऊ द्या.
९. हातावर थोडेसे मिश्रण घ्या आणि छोटे छोटे लाडू वळा.
१०. एका ताटात काढून, खायला द्या.
११. किंवा हवाबंद डब्यात ठेऊन नंतर खा.
  


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Rava Coconut Ladoo - रवा नारळ लाडू

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×