Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Churma Ladoo - चुरमा लाडू

राजस्थानी चुरमा लाडू आता भारतात पण आवडीने बनवले जातात आणि खाल्ले पण जातात.

ह्या दिवाळीत पारंपारिक लाडूच्या बरोबरीने चुरमा लाडू पण बनवून आपल्या घरच्यांना खुश करा.

शिका अतिशय सोपे चुरमा लाडू सोप्या पद्धतीने !

Read Churma Ladoo in English 

लागणारा वेळ : ४५ मिनिटे 
जणांसाठी :

साहित्य :
  • २ कप कणिक 
  • २ कप पिठीसाखर 
  • २ कप तूप 
  • वेलची पावडर 
  • १ चमचा भाजलेले खसखस 
  • सुकामेवा 
कृती :
१. Gas वर कढईत तूप वितळवायला ठेवा.
२. वितळलेले तूप एका भांड्यात घेऊन त्यात कणिक आणि पिठीसाखर घाला.
३. त्यात सुकामेवा घाला आणि नीट एकजीव करा.
४. वरील मिश्रण एका पातळ पंचात बांधून कूकर मध्ये १० - १५ मिनिटांसाठी शिजवून घ्या.
५. मिश्रण थंड होऊ द्या.
६. ह्या मिश्रणात वेलची पूड घाला.
७. हे मिश्रण हाताने चांगले मळून घ्या.
८. आता त्यातील थोडेसे मिश्रण हातावर घेऊन त्याचा छोटा लाडू वळा.
९. हा लाडू भाजलेल्या खसखस मध्ये घोळवून घ्या. खसखस लाडूला चारी बाजूनी चिकटली पाहिजे.
१०. आता बाकीच्या मिश्रणासाठी ही कृती करा.
११. तयार चुरमा लाडू ताटात काढून खायला द्या.
१२. किंवा हवाबंद डब्यात ठेऊन नंतर खा.


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Churma Ladoo - चुरमा लाडू

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×