Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Motichur Ladoo - मोतीचूर लाडू

मोतीचूर लाडू साधारण लग्नात किंवा एखाद्या मोठ्या प्रसंगी बनवले जातात. खमंग तुपात घोळवून तयार केलेले हे लाडू तोंडात टाकताच विरघळतात.

शिका मोतीचूर लाडू कसे बनवायचे.

Read Motichur Ladoo in English 

लागणारा वेळ : ६० - ७० मिनिटे 
जणांसाठी : ६० लाडू 

साहित्य : 
  • १/२ किलो बेसन 
  • १ किलो साखर 
  • १ किलो तूप 
  • वेलची पावडर 
  • केशर 
  • सुकामेवा, उभा पातळ कापून 
  • १ चमचा गुलाबपाणी 
  • केशरी खायचा रंग 
कृती : 
१. साखर पाण्यात घालून २ तारी पाक करा.
२. तयार पाक gas वरून काढून त्यात वेलची पावडर, खायचा रंग, केशर, सुकामेवा आणि गुलाब पाणी टाका.
३. बेसन चे पातळ मिश्रण तयार करा. त्यात गुठळ्या होऊ देऊ नका.
४. त्यात खायचा रंग टाका.
५. कढईत तूप टाकून gas वर ठेवा. त्यावर बारीक भोके असलेली जाळी धरा.
६. ह्या जाळीवर बेसन चे मिश्रण हळू हळू ओता. बुंदी तेलात पडतील त्या ४ - ५ मिनिटे तळून घ्या.
७. सगळ्या बेसनच्या मिश्रणासाठी असेच करा.
८. तयार बुंदी कढईतून काढून जास्तीचे तेल काढण्यासाठी टिशू पेपर वर काढून घ्या.
९. साखरेचा पाक थोडा गरम करून घ्या. Gas बंद करून बुंदी पाकात टाका. नीट एकजीव करा.
१०. थोडेसे मिश्रण हातात घेऊन छोटे-छोटे लाडू वळा.
११. अश्या प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
१२. सुकामेव्याचे उभे काप आणि चांदीचा वर्खनी सजवा.
१३. तयार लाडू एका ताटात काढून घ्या आणि खायला द्या.
१४. किंवा हवाबंद डब्यात ठेऊन नंतर खायला द्या.




This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Motichur Ladoo - मोतीचूर लाडू

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×