Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Rajgira Kadhi - राजगिऱ्याची कढी

नवरात्रीच्या उपसासाठी राजगिऱ्याची कढी.

लागणारा वेळ : २० मिनिटे
जणांसाठी: ३ - ४
Read Rajgira Kadhi in English
साहित्य :

  • १/२ कप राजगिरा पीठ 
  • २ कप दही 
  • १/४ चमचाआले-मिरची पेस्ट 
  • २ चमचे साखर 
  • कढीपत्ता 
  • १ चमचा तूप 
  • १ चमचा जिरे 
  • २ चमचे शेंगदाणे, भाजून 
  • ३ कप पाणी 
  • मीठ, चवीनुसार 
कृती :
१. राजगिरा पीठ, दही, मीठ आणि साखर एकत्र करा. गुठळी ठेऊ नका. 
२. ह्या मिश्रणात पाणी घालून बाजूला ठेऊन द्या. 
३. कढईत तूप गरम करून, जिऱ्याची फोडणी द्या. 
४. त्यात आले-मिरची ची पेस्ट टाकून मिनिटभर परता. 
५. आता राजगिरा - दही मिश्रण टाकून नीट हलवून १० मिनिटे शिजवा. कढईतील मिश्रण सतत हलवत रहा. 
६. कढी घट्ट होईपर्यंत मिश्रण हलवा. 
७. कढी घट्टसर झाली कि गॅस बंद करा. 
८. वाटीत कढी काढून कोथिंबिरीने सजवा. 
९. आलू-खिचडी बरोबर खायला द्या. 





This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Rajgira Kadhi - राजगिऱ्याची कढी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×