Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Oreo Pancake - ओरिओ पॅनकेक

Read Oreo Pancake in English
साहित्य :
पॅनकेक :
  • १ कप मैदा 
  • १ चमचा बेकिंग सोडा 
  • १/२ चमचा बेकिंग पावडर 
  • १/४ चमचे मीठ 
  • ४ चमचे साखर 
  • १/४ कप कोका पावडर 
  • १ अंडे 
  • १ १/३ कप दूध 
  • २ चमचे बटर 
  • ७ ओरिओ बिस्किट्स, चुरलेली 
क्रिम :
  • २ कप क्रिम 
  • १/४ कप साखर 
  • २ ओरिओ बिस्किट्स, चुरलेली 
  • चॉकोलेट सिरप 
कृती:
१. एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि कोको पावडर घेऊन नीट मिक्स करा. 
२. दुसऱ्या भांडत अंडे, बटर आणि दूध घेऊन नीट मिक्स करा. अंडे दूध आणि बटर बरोबर नीट एकत्र झाले पाहिजे. 
३. आता चुरलेली बिस्किट्स ह्या मिश्रणात ओतून नीट मिक्स करा. 
४. आता मैद्याचे मिश्रण वरील तयार अंड्याच्या मिश्रणात ओतून एकजीव करा. 
५. तयार मिश्रण ३० मिनिटे झाकून बाजूला ठेवा. 
६. गॅस वर तवा ठेऊन त्यात बटर वितळवून घ्या. आता १/४ कप मिश्रण घेऊन तव्यावर गोलाकार ओता. 
७. पॅनकेक दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
८. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे पॅनकेक तयार करा. 
९. क्रिम मिक्सर मध्ये टाकून मिक्स करून घ्या. क्रिम घट्ट झाले कि त्यात साखर टाकून परत एकदा फिरवा. 
१०. ह्या क्रिम मध्ये ओरिओ चुरा टाकून हलवून घ्या. 
११. आता प्रत्येक पॅनकेक च्या मध्ये क्रिम टाकून सर्वात वरती थोडे ठेवा. 



This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Oreo Pancake - ओरिओ पॅनकेक

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×