Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Chocolate Gujiya (Karanji) - चॉकोलेट करंजी

राजस्थानची लोकप्रिय डिश. येणाऱ्या होळीसाठी करून बघायला हरकत नाही.
लागणारा वेळ : ४० - ५० मिनिटे
Read Chocolate Gujiya in English

साहित्य :
  • १ कप मैदा 
  • पाणी 
  • ३ चमचे तूप 
  • मीठ,चवीनुसार 
सारण :
  • २ कप खवा 
  • १ १/२ काप पिठीसाखर 
  • वेलची पावडर 
  • १/२ कप चॉकोलेट चिप्स / ड्रिंकिंग चॉकोलेट 
  • १/२ कप सुकामेवा 
  • तेल, तळण्यासाठी 
कृती:
१. मैदा चाळून त्यात तूप आणि मीठ टाका. नीट एकत्र करून, थोडे-थोडे पाणी घेऊन घट्ट मळा. ओलसर कपड्यानी ३० मिनिटे झाकून  ठेवा. 
२. कढई गरम करून त्यात खवा/मावा सोनेरी रंग येईपर्यंत परता. आता त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून थोडा वेळ अजून परता. 
३. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. 
४. मिश्रण थंड झाले कि त्यात चॉकोलेट चिप्स/ड्रिंकिंग चॉकोलेट टाका आणि नीट मिक्स करा. 
५. हे झाले सारण तयार. 
६. आता झाकलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करा. एक गोळा घेऊन त्याची छोटी पुरी करा. 
७. पुरीच्या मध्यभागी तयार सारण चमचाभर टाका. पुरीच्या आकारानुसार सारण भरा. सर्व कडांना बोटानी पाणी लावा. 
८. पुरी मध्यभागी दुमडून कांदा एकमेकांवर ठेवून दाबून बंद करा. 
९. ह्याप्रमाणे सर्व पिठाच्या करंज्या तयार करून घ्या. ओलसर कपड्यानी झाकून  ठेवा. 
१०. कढईत तेल गरम करा आणि तयार करंज्या सोनेरी होईपर्यंत तळून काढा. 
११. टिशू पेपर वर करंज्या काढा. 
१२. तयार करंज्या प्लेट मध्ये काढून चॉकोलेट सिरप आणि सुकामेवा नि सजवून खायला द्या. 




This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Chocolate Gujiya (Karanji) - चॉकोलेट करंजी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×