Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Malpua with Rabri - मालपोहा आणि रबडी

गोड मालपोहा आणि घट्ट रबडी - येणाऱ्या होळीसाठी खास डिश
होळी स्पेशल

लागणारा वेळ : ६०
जणांसाठी : ४ - ५

Read Malpua with Rabdi in English

साहित्य :
मालपोहा मिश्रण :
  • १ कप मैदा 
  • ३ चमचे खवा किंवा दूध पावडर 
  • १/२ चमचा वेलची पावडर 
  • २ कप दूध 
  • चिमूटभर मीठ 
  • १ चमचा बडीशेप, बारीक 
  • १/२ कप तूप किंवा तेल (तळण्यासाठी)
साखर पाक :
  • १/२ कप साखर 
  • १/४ कप पाणी 
रबडी :
  • ५ कप दूध 
  • साखर, गरजेनुसार 
  • १/२ चमचा वेलची पावडर 
  • केशर 
  • १ चमचा गुलाब पाणी 
  • बदाम, पिस्ता काप 
कृती:
मालपोहा मिश्रण :
१. मैदा, दूध पावडर किंवा खवा, बडीशेप, वेलची पावडर एका मोठ्या भांड्यात घेऊन नीट मिक्स करा. 
२. ह्या कोरड्या मिश्रणात थोडे थोडे दूध घालून एकत्र करा. जरा जाडसर मिश्रण ठेवा. गुठळी नको. 
३. हे मिश्रण ३० मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवा. 

साखर पाक :
४. मंद आचेवर साखर आणि पाणी एकत्र करून गरम करत ठेवा. साखर विरघळू दे. 
५. साखरेचा एकतारी पाक तयार करा. 
६. तयार पाकात वेलची पावडर घालून झाकून ठेवा. 

मालपोहा :
७. कढईत तूप किंवा तेल गरम करत ठेवा. २ चमचे मालपोहा मिश्रण तापलेल्या तेलात सोडा. मिश्रण एकदा तेलात सोडले कि त्याला पसरवू नका. ते आपले आपण गोल आकार घेते. 
८. जोपर्यंत तेलातील मालपोह्याच्या कडा सोनेरी होत नाहीत, तोपर्यंत त्याला हात लावू नका. माध्यम आचेवर मालपोहा शिजवून घ्या. एक बाजू सोनेरी झाली कि उलटून दुसरी बाजू टाळून घ्या. 
९. तयार मालपोहा टिशू पेपर वर काढा. आणि लगेच साखरेच्या पाकात टाका. किमान १/२ मिनिट साखरेच्या पाकात मालपोहा राहू द्या. 
१०.  साखरेच्या पाकातील तयार मालपोहा डिश मध्ये काढा. बाकीच्या मिश्रणाचे असेच मालपोहे बनवून डिश मध्ये ठेवा. 

रबडी :
११. जाड बुडाच्या पातेल्यात ५ कप दूध सुटण्यासाठी ठेवा. मध्ये मध्ये चमच्याने ढवळत रहा. म्हणजे दूध खाली लागणार नाही. 
१२. दुधाच्या वर जमा झालेली साय काढत रहा. 
१३. दूध अर्धे आणि घट्ट झाले कि गॅस वरून उतरवा. आता त्यात साखर घालून, ती विरघळेपर्यंत ढवळा. 
१४. केशर आणि गुलाब पाणी घाला. सुकामेवा घाला. 
१५. तयार रबडी वाटीत काढून मालपोहा बरोबर खायला द्या. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Malpua with Rabri - मालपोहा आणि रबडी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×