Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Chicken Palak - चिकन पालक

लागणारा वेळ : ४५ मिनिटे
जणांसाठी : ४ - ५

Read Chicken Palak in English

साहित्य:
  • १ किलो चिकन 
  • २ पालकाच्या जुड्या 
  • २ कांदे, माध्यम आकाराचे, बारीक कापलेले 
  • २ टोमॅटो, माध्यम आकाराचे, बारीक कापलेले 
  • २ हिरव्या मिरच्या, बारीक कापलेल्या 
  • ५ वेलच्या 
  • ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून 
  • १ चमचा आले, बारीक कापलेले 
  • २ चमचे मोहरी पावडर 
  • १ चमचा धने पावडर 
  • ३/४ चमचे लाल तिखट 
  • १ चमचा मिरी पूड 
  • १ चमचा गरम मसाला पावडर 
  • २ तमालपत्र 
  • १/४ चमचा हळद 
  • ४ - ५ चमचे दही 
  • १/४ कप तेल 
  • मीठ, चवीनुसार 
कृती :
१. पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. चिकन स्वच्छ धुऊन तुकडे करून घ्या. 
२. पालक शिजवून, थंड झाल्यावर मिक्सर मधून पेस्ट करा. 
३. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करत ठेवा. त्यात तमालपत्र, वेलच्या, लसूण पाकळ्या घालून मिनिटभर परता. 
४. त्यात कांदे, टोमॅटो, लसूण, आले घालून कांदा लालसर होईपर्यंत परता. 
५. आता त्यात चिकन, लाल तिखट, गरम मसाला, मिरी पूड, हळद, धने पूड, जिरे पूड  आणि मीठ घालून परता. 
६. दही घालून चिकन लालसर होईपर्यंत परता. 
७. नंतर पालक पेस्ट घालून वर झाकण ठेऊन नीट शिजवा. 
८. रस्सा दाटसर होईपर्यंत शिजवा. 
९. गरम चिकन पालक भात किंवा पोळी बरोबर खायला द्या. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Chicken Palak - चिकन पालक

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×