Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Rawas Fish Cutlet - रावस फिश कटलेट

लागणारा वेळ : ४५- ५० मिनिटे
जणांसाठी : ४ - ५
Read Rawas Fish Cutlet In English
साहित्य :
  • २५०gm रावस माशाचे तुकडे 
  • २ मोठे बटाटे, उकडून 
  • १/२ कप पावाचा चुरा 
  • १ चमचा आले-लसूण-मिरची पेस्ट 
  • १ चमचा कोथिंबीर, बारीक चिरून 
  • १ अंडे, फेटलेले 
  • मीठ, चवीनुसार 
  • तेल, तळण्यासाठी 
कृती :
१. रावस मासा नीटपणे शिजवून घ्या. 
२. मासा पूर्ण शिजला कि बाहेर काढून त्यातील काटे काढून त्याला किसून घ्या. 
३. बटाटे सोलून त्यांचा लगदा करा. 
४. एका मोठ्या भांड्यात, बटाटे, रावस मासा, आले-लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर, १ चमचा पावाचा चुरा, मीठ घेऊन नीट मळून घ्या. 
५. मळलेल्या पिठातून थोडा भाग हातावर घेऊन आपल्या आवडत्या आकाराचे कटलेट बनवा. 
६. तयार कटलेट पहिले फेटलेल्या अंड्यात आणि मग पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या. 
७. तव्यावर तेल गरम करून हे कटलेट शॅलो-फ्राय करा. 
८. गरम कटलेट्स टोमॅटो केचप बरोबर खायला द्या. 



This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Rawas Fish Cutlet - रावस फिश कटलेट

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×