Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Chili-Cheese Baked Potato - चिली चीज बेक्ड पोटॅटो

चिली चीज बेक्ड पोटॅटो करून बघा नवीन वर्षात

लागणार वेळ : १ तास
जणांसाठी : ४ - ५

Read Chili-Cheese Baked Potato in English

साहित्य:
  • ४ मध्यम आकाराचे बटाटे, सोललेले 
  • १ चमचा हिरवी मिरची, बारीक कापलेली 
  • १ कप प्रोसेसज्ड चीज, किसलेले 
  • ३ कांद्याच्या पाती, कापलेल्या 
  • २ कप दूध 
  • ५ -६ लसूण पाकळ्या, बारीक कापून, चेचून  
  • १/२ कप फरसबी, धुऊन, पाणी काढून 
  • १/२ टोमॅटो, बारीक कापून 
  • मीठ, चवीनुसार 
कृती:
१. ओव्हन १८० डिग्री C ला गरम करून घ्या. एका भांड्यात कांद्याची पात आणि कांदे, हिरवी मिरची, चीज, टोमॅटो आणि फरसबी घेऊन नीट मिक्स करा. त्यात चेचलेल्या लसूण पाकळ्या घालून परत मिक्स करा. 
२. बटाबटाटयाचे जाडे काप करा. आणि त्यातील थोडे बेकिंग डिश मध्ये ठेवा. हा झाला पहिला थर. 
३. त्यावर चिली-चीज चे मिश्रण समान स्प्रेड करा. 
४. त्यावर १ कप दूध ओता. आणि वर मीठ आणि काळीमिरी पूड पसरवा. 
५. उरलेल्या बटाटयाचे काप आणि चिली-चीज मिश्रण घेऊन वरीलप्रमाणे थर लावा. 
६. उरलेले १ कप दूध ओता. आणि वर मीठ आणि काळीमिरी पूड पसरवा.
७. हि बेकिंग डिश ओव्हन मध्ये १० - १२ मिनिटे बेक करा. 
८. नंतर ओव्हन १७० डिग्री C वर ठेऊन परत ४० मिनिटे बेक करा. 
९. गरम-गरम खायला द्या.


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Chili-Cheese Baked Potato - चिली चीज बेक्ड पोटॅटो

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×