Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Fish Manchurian - फिश मन्चुरिअन

लागणारा वेळ - ५० मिनिटे
जणांसाठी - ६ -  ७


Read Fish Manchurian in English

साहित्य :
  • १/२ किलो मासा (तुकडे करून, धुतलेला )
  • ४ चमचे मैदा 
  • ४ चमचे सोया सॉस 
  • २ चमचे आले-लसूण पेस्ट 
  • २ चमचे लिंबूरस 
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक कापून)
  • २ चमचे टोमॅटो प्युरी 
  • १ कांदा (कापलेला )
  • लाल तिखट पेस्ट (सुक्या लाल मिरच्या पाणी घालून वाटून)
  • २ चमचे कॉर्न-फ्लोर 
  • १/२ अजिनोमोटो 
  • १ अंडे (फेटलेले)
  • १/२ चमचा काळी मिरी पावडर 
  • मीठ, चवीनुसार 
  • तेल 
  • व्हिनेगर 
  • किथिंबीर 
कृती:
१. माशाचे तुकडे मीठ, लिंबूरस आणि काळी मिरी पावडर घालून एकजीव करून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा. 
२. दुसऱ्या भांड्यात, कॉर्न-फ्लोर, मैदा, अंडे, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घेऊन पाताळसे मिश्रण तयार करा. लागेल तसे पाणी वापरा. 
३. कढईत तेल गरम करत ठेवा. माशाचे तुकडे वरील पातळ मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून काढा. 
४. दुसऱ्या कढईत २ चमचे तेल टाकून त्यात आले-लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परता. 
५. आता त्यात कांदा, हिरव्या मिरच्या घालून परता. 
६. टोमॅटो प्युरी घालून परता. 
७. मीठ आणि साखर घालून मिनिटभर परता. 
८. आता त्यात सोया सॉस, लाल तिखट पेस्ट, व्हिनेगर घालून मिक्स करा. 
९. कॉर्न-फ्लोर चे मिश्रण उरले असेल तर तेही घाला. त्यामुळे ग्रेव्ही ला दाटपणा येईल. 
१०. आता अजिनोमोटो आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवा. ग्रेव्ही दाट झाली पाहिजे. 
११. आता तळलेले माशाचे तुकडे टाकून नीट मिक्स करा. 
१२. कोथीबीरनी सजवून भाताबरोबर वाढा. 

टीप - अजिनोमोटो नसेल वापरायचा तर ती स्टेप सोडून द्या. 





This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Fish Manchurian - फिश मन्चुरिअन

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×