Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Popcorn Chicken - पॉपकॉर्न चिकन

लागणार वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : ४ - ५


Read Popcorn Chicken in English 
साहित्य :
  • ३००gm चिकन (बोनलेस)
  • १/४ चमचा कांदा पावडर 
  • १/४ चमचा लसूण पावडर 
  • १/४ चमचा हळद 
  • १ चमचा लाल तिखट 
  • मिरपूड
  • मीठ 
  • १  कप कॉर्न फ्लोर 
  •  १ कप मैदा 
  • १/४ चमचा लिंबू रस 
  • १/४ चमचा आले-लसूण पेस्ट 
  • २ अंड्याचे पांढरे 
  • २ चमचा दूध 
  • १ कप पावाचा चुरा / कॉर्न फ्लेक्स 
कृती :
१. चिकन ला लिंबूरस, मीठ, मिरपूड आणि आले-लसूण पेस्ट चोळून १५ - २० मिनिटे मुरण्यासाठी ठेवा. 
२. एका भांड्यात मैदा, कॉर्न फ्लोर, मीठ, मिरपूड, कांदा पावडर, लसूण पावडर, लाल तिखट हळद घालून एकजीव करा. 
३. दुसऱ्या भांड्यात अंडे, मिरपूड आणि मीठ घेऊन नीट फेटून घ्या. 
४. एका भांड्यात पावाचा चुरा किंवा चुरा केलेले कॉर्न-फ्लेक्स, मीठ आणि मिरपूड घ्या. नीट मिक्स करा. 
५. आता चिकनचे तुकडे घेऊन ते मैदा-कॉर्न फ्लोर च्या मिश्रणात घोळवा. चिकन सर्व बाजूनी नीट कोट झाले पाहिजे. 
६. आता ते अंड्याच्या मिश्रणात घोळवा. 
७. आता पावाच्या मिश्रणात घोळवा. १० मिनिटे घोळवलेले तुकडे तसेच राहू द्या म्हणजे कोटिंग नीट चिकटेल. 
८. एका कढईत तेल गरम करा. कोट केलेले चिकनचे तुकडे तेलात तळा. चिकन कुरकुरीत झाले पाहिजे. 
९. टिशू पेपर वर चिकन काढून तेल निथळू द्या. 
१०. तयार पॉपकॉर्न चिकन केचप बरोबर खायला द्या. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Popcorn Chicken - पॉपकॉर्न चिकन

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×