Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Bharali Bhendi - भरली भेंडी


Read bharali bhendi in English
लागणारा वेळ - ३० मिनिटे
जणांसाठी - २- ३

साहित्य : 
  • भेंडी - २५० gm 
  • तेल - २ चमचे 
  • मोहरी - १/४ चमचा 
  • कढीपत्ता 
  • हिंग - १/४ चमचा 
आत भरण्यासाठी सारण :
  • ताजा खवलेला नारळ - १/४ कप 
  • कोथिंबीर 
  • साखर - १/२ चमचा 
  • मीठ, चवीनुसार 
  • कांदा - १/३ कप, बारीक कापलेला 
  • गोडा मसाला  - २ चमचे 
  • लिंबू रस - २ चमचे 
  • हळद - १/४ चमचा 
  • लाल तिखट - १ चमचा 
  • भाजलेले शेंगदाणे - २ चमचे 
  • तीळ - १/२ चमचा 
कृती :
१. भेंडी धुऊन पुसून कोरडी करा. 
२. प्रत्येक भेंडीला उभी चीर द्या. 
३. कढई गरम करत ठेवा त्यात तीळ आणि नारळ भाजून घ्या. नारळ थोडा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजा. 
४. भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि नारळ वाटून घ्या. 
५. वाटण एका भांड्यात काढून त्यात 'आत भरण्यासाठी सारण' मधील सर्व साहित्य घाला. नीट मिक्स करा. 
६. हे तुमचे भेंडीत भरायचे सारण तयार झाले. 
७. आता हे सारण सर्व भेंडी मध्ये नीट भरा . 
८. कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात हळद, कढीपत्ता आणि लाल तिखट टाका. 
९. भरलेल्या भेंडी एक-एक करून कढईत ठेवा. 
१०. सारण उरले असेल तर तेही टाका. 
११. नीट मिक्स करून भेंडी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. 
१२. एका बाजूनी भेंडी नीट शिजली कि दुसऱ्या बाजूनी बाजू पालटून दुसरीकडून नीट शिजवा. 
१३. तयार भरली भेंडी डाळ-भात आणि फुलका,चपाती बरोबर वाढा . 




This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Bharali Bhendi - भरली भेंडी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×