Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Kaali Rani: ‘काळी राणी’ येणार रंगभूमीवर; विजय केंकरेंचं शंभरावं नाटक

Kaali Rani: नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली 40 वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे  प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ (Kaali Rani) या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. ‘काळी राणी’ हे त्यांचं 100 वं नाटक 11 डिसेंबरला रंगभूमीवर येतयं. या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे 100  वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाटयकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. रत्नाकर मतकरी यांचे 90 वे नाटक,  प्रदीप मुळ्ये 200 वे नाटक, अजित परब 40 वे नाटक शीतल तळपदे 125 वे नाटक, मंगल केंकरे 50 वे नाटक वे नाटक राजेश परब 50 वे नाटक, अक्षर शेडगे 1400 वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे 51 वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ या नाटकाने साधला आहे. 

‘काळी राणी’ या नाटकात मनवा नाईक, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी, आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ ‘हमिदाबाईची कोठी’, ‘हॅम्लेट’ नंतर मनवा नाईक हीचं ‘काळी राणी’ हे नवीन नाटक आहे. डॉ. गिरीश ओक यांचा 6666 वा प्रयोग या नाटकाद्वारे रंगणार आहे.

 हे नाटक आहे..एका राणी च..जिचं स्वप्न आहे.. मायानगरी  मधल्या रंगीबेरंगी दुनियेवर राज्य करण्याचं, एका अश्या लेखकाचं,ज्याचा प्रत्येक चित्रपट सिल्व्हर जुबली आहे ..ज्याच्या साठी फक्त स्वतःच नावच सर्वस्व आहे.आणि एका निर्मात्याच ज्यानी ह्या दोघाना  चित्रपट सृष्टी ची सफर घडवलेली आहे, हा निर्माता म्हणजे चित्रपटसृष्टी नी पाहिलेला सर्वात मोठा शो मॅन. एकमेकांच्या स्वप्नांत अडकलेल्या तीन व्यक्ती तुमच्या भेटीला येणार आहेत. ‘काळी राणी’ ह्या दोन अंकी नाटकामधून.

मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांचे असून दिग्दर्शन- विजय केंकरे यांचे आहे. नेपथ्याची प्रदीप मुळ्ये तर प्रकाशयोजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. संगीत अजित परब यांचे असून वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. रंगभूषा राजेश परब यांची असून वेशभूषा संध्या खरात यांची आहे सूत्रधार संतोष शिदम आहेत.  या नाटकाचे निर्माते प्रिया पाटील,डॉ. माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम आहेत.
 
विजय केंकरे यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांमध्येही काम केले असले तरी नाटक हाच त्यांचा पिंड. रंगभूमीवर अव्याहत न थकता काम करणारी जे रंगकर्मी आहेत  त्यात विजय केंकरे हे नाव आवर्जून घ्यावे लागले. केवळ पारंपरिक पद्धतीने 'थिएटर' करत राहिले नाहीत, तर प्रयोगशील नाट्यकर्मी म्हणून फार मोलाचे काम त्यांच्या हातून घडले आहे. 

व्यवसायिक आणि समांतर रंगभूमीवर त्यांनी सातत्याने काम केलं आहे. एवढंच नाही तर 17 वेगवेगळया  देशात प्रयोग झालेआहेत. विजय केंकरे यांनी परदेशात जाऊन विशेषतः brodway  आणि west end वर जाऊन अनेक नाटकं पाहिली आहेत, त्यावर लोकसत्ता मध्ये त्यांनी जे लेख लिहिले आहेत त्यावर त्यांची west end via brodway हे पुस्तक अक्षर प्रकाशन ने प्रकाशित  केले आहे. या नाटकांच्या निमित्ताने जगातल्या वेगवेगळ्या नाटय शैली चा अभ्यास केला आहे.
 
आपल्या वडिलांचा दामू केंकरे यांचा रंगभूमीचा खणखणीत वारसा घेऊन विजय केंकरे यांची वाटचाल सुरु आहे. व्यवसायिक आणि समांतर रंगभूमीवरील सुमारे शंभर नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विजय केंकरे यांनी आजवर वेगवेगळया भिन्न जातकुळीची नाटकं दिग्दर्शित करून टाइपकास्ट न होण्याची दक्षता घेतली. यातूनच त्यांच्या यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्दीची कल्पना येईल

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

 



from theatre https://ift.tt/dgyPHIq
https://ift.tt/Cl1pwie


This post first appeared on Prem Kavita | Marathi Kavita | Marathi Love Poem, please read the originial post: here

Share the post

Kaali Rani: ‘काळी राणी’ येणार रंगभूमीवर; विजय केंकरेंचं शंभरावं नाटक

×

Subscribe to Prem Kavita | Marathi Kavita | Marathi Love Poem

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×