Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मळभ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

 कवितेचा उत्सव 

☆ मळभ ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज मी या वृक्षतळी

अशी उदास बसलेली

मनी सवे  भारलेल्या

तव प्रेमाच्या चाहुली

*

तुझ्या मिठीत सजलेल्या

 किती सुरम्य सांजवेळा

कुंतली या मोगऱ्याचा

प्रीतगंध दरवळला

*

क्षण क्षण तो सुरंगी

चांदण्यात भिजलेला

राग रागिणी  सुरांनी

धुंद असा नादावला

*

दाटले का तुझ्या मनी

मळभ  रे संशयाचे

काय जाहले नकळे

दुभंगले नाते प्रीतीचे

*

 पखरली वाट तुझी

 कधीच मी आसवांनी

पाहते वाट अजुनी

येशील तू परतूनी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मळभ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मळभ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×