श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(एक गेय रचना)
Related Articles
आला आला ग धावुनी/ सखा पाऊस साजणी.
आला आला ग धावुनी/ सखा पाऊस साजणी.———–!!धृ !!
आता सरला उन्हाळा/ ढग आभाळी सावळा
देतो नव्यानं उभारी / लावी धरतीला लळा
मग मिळतो इशारा /आता करावी पेरणी —————————! १ !
चालू झाली बातचीत/ आता सरली उसंत
नव्या उमेदीने नवी /आस जागली मनात
चला भिडुया कामाला / माती कपाळी लावूनी————–!२!
एक सपान जोमात/ पीक पिकवलं रानात
होऊ सुखी समाधानी/ सखा बोलला कानात
भोगताना सुखदुःख / जड होईल पापणी———————–!३!
कष्ट सोसता सोसता/ वाढे संसाराचा गुंता
नाही निसर्गावरती / इथं कुणाचीच सत्ता
देव येतो धावुनीया /सोडवाया अडचणी ————————!४!
झाली आबाळ देहाची/ तगमग या जीवाची
खुळ्या काळजाला आता / आस लागली भेटीची
नाही दुजा भाव मनी / झालं रंग तसं पाणी ———————–!५!
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.
This post first appeared on ई-अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿ - साहितà¥à¤¯ à¤à¤µà¤‚ कला विमरà¥à¤¶ (हिनà¥à¤¦à¥€/मराठी/अङà¥à¤—à¥à¤°à¥‡à¥›à¥€), please read the originial post: here