श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आधार तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
Related Articles
जननायका जनलोक हे म्हणती तुला करुणाकरा
जगजीवना आधार तू व्हावे मला शशिशेखरा
आनंदल्या गोपांसवे लीला तुझ्या वृंदावनी
राधा सखी आजन्म ही आहे तुझी मुरलीधरा
बांधील तू आहेस ना विश्वास या तारावया
लक्ष्मीपते वसतोस तू शेषावरी कमलाकरा
उद्धारण्या देवादिका निळकंठ तू झालास ना
रिझवायला माथी तुझ्या गंगा वसे गंगाधरा
व्योमात तू रोमात तू प्रांणातही तू सर्वदा
असते कशी सजिवातही वस्तीतुझी धरणीधरा
जगणे असो मरणे असो लय पावते चरणी तुझ्या
पद्माकरा सृष्टीस या सांभाळ तू राजेश्वरा
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधार तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.
This post first appeared on ई-अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿ - साहितà¥à¤¯ à¤à¤µà¤‚ कला विमरà¥à¤¶ (हिनà¥à¤¦à¥€/मराठी/अङà¥à¤—à¥à¤°à¥‡à¥›à¥€), please read the originial post: here