सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ तीसुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
Related Articles
आठवांचा पिंगा बाई
माझिया तनामनात
तिच्या असंख्य रुपांची
सजे आरास मनात
रणरागिणी, मायभवानी
शिवाची तू अर्धांगिनी
शौर्यासह माया नांदते
तू सुंदरा,गे ओजस्विनी
असुर माजले दुराचारी
भोग्य मानती ते नारी
त्यांचे करण्या निर्दालन
रुप घेई गे तूच विखारी
कठीण वज्रापरी,कधी
लोण्याहूनी मृदू अंतरी
रुप तिचे असेच ईश्वरी
तीच गे योगयोगेश्वरी
वेदानीही ना जाणिले
रुप तुझे अगम्य ऐसे
विश्वाची चैतन्य ऊर्मी
तेज सौदामिनी जैसे
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.
This post first appeared on ई-अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿ - साहितà¥à¤¯ à¤à¤µà¤‚ कला विमरà¥à¤¶ (हिनà¥à¤¦à¥€/मराठी/अङà¥à¤—à¥à¤°à¥‡à¥›à¥€), please read the originial post: here