Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #234 ☆ घातकी श्वास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 234

घातकी श्वास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येवढा विश्वास त्यावर, देह झाला दास होता

थांबलेला ऐन वेळी, घातकी तर श्वास होता

*

कोडमारा होत होता, मोडता चौकट न आली

उंबरा शालीनतेचा, माझिया दारास होता

*

पान मेंदीचे मनाला, भावले होतेच हिरवट

लाल केले हात त्याने, खेळला मधुमास होता

*

कंगव्याची पाच बोटे, मोगऱ्याने धुंद झाली

म्हणुन गजरा माळण्याचा, ध्यास ह्या केसास होता

*

चावुनी केला विड्याचा, तू जरी चोथा तरीही

रंगण्याचा छंद येथे, केवढा कातास होता

*

अन्नपूर्णा या घराची, रांधणारी वाढणारी

वैभवाचा वारसाही, आमच्या वंशास होता

*

चूल होती जाळ होता, होम होता पेटलेला

धूर राखेशी घरोबा, वाढलेला खास होता

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #234 ☆ घातकी श्वास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #234 ☆ घातकी श्वास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×