Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सत्तेचा मस्तवालपणा..कोरा कागद निळी शाही आम्ही कुणाला भीत नाही

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच धर्तीवर काम सुरू असल्याची टीका सर्व थरातून केली जात आहे. आधी लोकशाही मराठी चॅनलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्याविरोधात देखील किरीट सोमय्या प्रकरणात आधी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तर लोकशाही चॅनेलच ७२ तास बंद करण्यात आलेला आहे .

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये कमलेश सुतार म्हणाले, किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी ७ वाजेपासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश वाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता प्राप्त झाले. सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवरील सुतार यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली आहे. लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता. सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निर्णय देण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असंही कमलेश सुतार यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलेले आहे .

View this post on Instagram

A post shared by Kamlesh Sutar (@sutarkamlesh)

किरीट सोमय्या यांची एक क्लिप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली होती त्यानंतर ही क्लिप लोकशाही चॅनलने जशीच्या तशी दाखवली म्हणून लोकशाही मराठी चॅनेलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता .राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकारांवरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलेला होता . राज्य सरकारने हीच तत्परता बारसू प्रकरणात का दाखवली नाही ? असा खडा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला होता. .

‘ जशीच्या तशी ‘ बातमी स्पष्टपणे दाखवली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता जशीच्या तशी बातमी दाखवणे म्हणजे काही गुन्हा ठरतो आहे का ? असा देखील संतप्त सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात असून जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्जनंतर राज्य सरकारच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक उदाहरण म्हणून हा प्रकार समोर आलेला आ किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत असून सर्व स्तरातून या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे.



This post first appeared on Ahmednagar News In Marathi, please read the originial post: here

Share the post

सत्तेचा मस्तवालपणा..कोरा कागद निळी शाही आम्ही कुणाला भीत नाही

×

Subscribe to Ahmednagar News In Marathi

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×