Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘ ऑपरेशन लोटस ‘ चा फज्जा , विधानसभेत चक्क 93 विरुद्ध शून्य

ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही त्या राज्यात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आरोप केंद्रावर करण्यात आले आहेत. दिल्लीपाठोपाठ पंजाब येथेदेखील भाजपचे ऑपरेशन लोटस संपूर्णपणे फेल गेलेले असून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध केलेले आहे. विधानसभेत 93 विरुद्ध शून्य अशा फरकाने भगवंत मान सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकलेला आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केलेला आहे.

भगवंत मान यांनी 27 सप्टेंबर रोजी विश्वासदर्शक ठराव मांडलेला होता त्यावर सोमवारी प्रत्यक्षात चर्चा झाली. विधानसभेच्या कामकाजासाठी भाजपचे अश्विनी शर्मा आणि जंगी लाल महाजन हे दोन आमदार गैरहजर राहिले होते तर काँग्रेसने देखील कामकाजावर बहिष्कार टाकलेला होता. इतर पक्षांनी या प्रस्तावात मतदानही केलेले नाही त्यामुळे 93 विरुद्ध अशा विक्रमी फरकानी आम आदमी पार्टीने विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे.

आम आदमी पार्टीच्या आमदार शीतल अंगूरल यांनी या प्रकरणी बोलताना पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सरकार अस्थिर करून तिथे ऑपरेशन लोटस भाजपने हाती घेतले होते. ऑपरेशन लोटससाठी आमदारांना पद आणि पैसा देण्याचे आमिष देखील भाजपने दाखवले मात्र आमचे आमदार हे प्रामाणिक आहेत आणि ते सहजासहजी खरेदी करता येणार नाहीत त्यामुळे भाजपने पुढील काळात असे प्रकार करू नये, असेदेखील त्यांनी म्हटले विशेष म्हणजे विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पंजाबच्या विधानसभेत भाजप मुर्दाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या .



This post first appeared on Ahmednagar News In Marathi, please read the originial post: here

Share the post

‘ ऑपरेशन लोटस ‘ चा फज्जा , विधानसभेत चक्क 93 विरुद्ध शून्य

×

Subscribe to Ahmednagar News In Marathi

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×