महाराष्ट्रातील अत्यंत जाज्वल्य व जागृत साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री सप्तशृंगी देवी हे स्वयंभू शक्तिपीठ आहे. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन गडावर स्थिरावला, अशी ही आदिमाया दशअष्ठभुजावाली महिषासुरर्मदिनी हीच महालक्ष्मी, हीच महाकाली व हीच महासरस्वती होय. या त्रिगुणात्मक आद्य शक्तिपीठाचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांतून आढळतो. सप्तशृंगीगडावर श्री भगवतीच्या तपस्येकरिता व आशीर्वादाकरिता अनेक थोर ऋषीमुनी, संत महात्मे आल्याचे दाखले आहेत. प्रभु रामचंद्र हे वनवासात असताना श्री भगवतीच्या दर्शनाला आले होते.
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या पर्वत रांगेत सात शिखरे असलेल्या गडावर समुद्रसपाटीपासून ४६00 फूट उंचीवर असलेल्या गडावर सप्तशृंगीमातेचा निवास आहे. गडाच्या पूर्वेस मार्कन्डेय पर्वत, सतीचा कडा, तर दक्षिणेस श्री गणेश मंदिर, शिवालय तीर्थ असून, चहूबाजूने असलेल्या निसर्गरम्य झाडांनी अच्छादिलेल्या पर्वताच्या रांगा, दर्या, धरणे, तलाव, जलधारा हे परिसराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. आनादि काळापासून घुमणारे मंत्रोच्चार ऋषीमुनीचा पावन चरणस्पर्श यामुळे हा परिसर आपल्यामधील अंतरात्माला साद घालतो, असा या आदिमातेचा मार्ग आहे. सप्तशृंगी गडावर दरवर्षी अश्विन, तसेच चैत्र महिन्यात श्री भगवतीचा नवरात्रोत्सव लाखो भाविकांच्या खरा आनंद मिळण्याचा मन:शांती जीवनाचा अनुभवण्याची व चराचराच्या जननीपुढे नतमस्तक होण्याचा असतो.
Recent Posts
- सिक्रेट सुपरस्टार
- शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
- सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
- देखो_माही_मार_रहा_हैं
- आदिमाया श्री सप्तशृंगी माता
- नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
- नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
- विजयादशमी
- सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…
- तुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…
- असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक
- रेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू
- लूक्सवर द्या लक्ष
- व्हायरसला आळा घालण्यासाठी…
- सावधान…पसरलंय कार्डिंगचं जाळं!
Related Articles
The post आदिमाया श्री सप्तशृंगी माता appeared first on Achiseekh ( Marathi ).