Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अशोक सराफ – एक असं व्यक्तिमत्व जो गेला ४० वर्ष मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून राज्य करतोय

एक अस व्यक्तिमत्व जो गेला ४० वर्ष मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून राज्य करतोय . सम्राट चित्रपटसृष्टीचा, सम्राट लोकांच्या मनाचा अशोक सराफ, एक गुणी कलावंत . १९६०च्या दशकातील एका आंतर बँक एकांकिका स्पर्धेत हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या अफलातून विनोदाच्या जोरावर ज्या तरुणान झुलवल आणि त्यानंतरची ५ दशक रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या मोहिनीन गुरफटून टाकल असा एक गुणी कलावंत बहुरूपी अशोक सराफ .

ashok-saraf-photo

मुळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ला मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्याचं बालपण गेल. मुंबईतील डीजीटी विद्यालयात त्यांच शिक्षण पूर्ण झालं . लहानपणापासून अभिनयाची आणि नाटकाची खूप आवड असणाऱ्या याच कलाकारान वयाच्या १८व्या वर्षी शीरवाळकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकात विदुषकाची भूमिका साकारली आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला . त्याचवेळेस काही संगीत नाटकावरही भूमिका साकारणाऱ्या या अशोक सराफ यांनी गजानन जहागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका स्वीकारली .

इसवी सन १९७१ पासूनचा हा प्रवास खरच कौतुकास्पद आहे . मराठी नाटक, मराठी चित्रपट, हिंदी सिनेमा, मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणीच्या मालिका यांमध्ये झळकणाऱ्या या बहुरूप्याने आपणा सर्वांचं हृदय काबीज केलेलं आहे . अशातच त्यांना सहवास लागला अश्याच एका दिग्गज कलाकाराचा शाहीर दादा कोंडके यांचा, त्यातून निर्माण झाला पांडू हवालदार त्यासाठी या कलाकाराच्या पाठीवर महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने कौतुकाची थाप पडली . इतकच नव्हे तर १९७७ च्या राम राम गंगाराम मधल्या ममद्याने प्रेक्षकाना भुरळ पाडली आणि मामाच्या क्षेरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला तो म्हणजेच “filmfare awards”.

हिंदी सिनेमासृष्टीत पहिलं पाऊल ठेवल ते दामा या चित्रपटातून आणि मग यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न करून त्यांनी एक एक पायरी चढली आणि मग अबोध, फुलवारी यांसारख्या अनेक सिनेमामधून हिंदी सिनेमासृष्टीला आपली दखल घ्यायला लावली ती या लाडक्या मामांनी . अशोक सराफ म्हणजेच अस्खलित विनोद अस समीकरण झालं . अशोक सराफ हे नाव चित्रपट सृष्टीत खणखणीत नाण म्हणून वाजू लागलं . शासनाचा पुरस्कार आणि मामा यांचे संबंध हळूहळू द्रुढ झाले होते. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायक प्रवृत्तीपर्यंत विविध छटाचे दर्शन आपल्या नाट्य आणि चित्रसृष्टीद्वारे कामाने घडविले आहे . मामांच्या गाजलेल्या चित्रपटाप्रमाणे ‘माझी माणस’ आणि ‘आत्मविश्वास’ यांमधल्या मामांच्या भूमिका लक्ष्यात राहण्यासारख्या आहेत. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखाच नव्हे तर चौकट राजा मधील भूमिका आपल्या चांगलीच लक्षात आहे .

८०च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली . अशी ही बनवाबनवी, धुमधडाका यासारख्या चित्रपटमार्फत मराठी सिनेमाजगतात धमाल उडवून दिली . अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाची साथ मिळवून नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा यापासून अलीकडच्या शुभ मंगल सावधान, आई नंबर1, पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांनी खिळवून ठेवले . १९८७-१९८८ मध्ये मामांची कामगिरी संसस्मरणीय ठरली . अशी हि बनवाबनवी या सिनेमाने तर मामांना भरघोस प्रसिद्धीची दानच दिल . हिंदी सिनेमासृष्टीत करण अर्जुन, कोयला, येस बॉस, जोडी नंबर1 आणि सिंघम हे अशोक सराफ यांचे उल्लेखनीय चित्रपट याच अभिनेत्यान २००७ साली परदेशी रंगमंचावर पाऊल ठेवल . विजय केंकरे दिग्दर्शित हे राम कार्डीओग्राम या नाटकात त्यांनी अभिनय केला .

यश आणि अशोक सराफ जणू काही हातात हात घालून चालत होते . मामांच्या लोकप्रियतेच एक उदाहरण म्हणजेच चौकट राजा या सिनेमाच शूटिंग एका स्मशानभूमीत चालू असताना आपल काम बाजूला ठेवून मामांना पाहण्यासाठी थेट स्मशानभूमीत गर्दी केली होती . मामांनी चित्रपटसृष्टीप्रमाणे नाट्यसृष्टी हि गाजवली प्रेमा तुझा रंग कसा, मनोमीलन या सर्वच नाटकात रसिक प्रेक्षकांच प्रेम मामांनी हक्कांनी मिळवल .

Ashok-saraf-nilu-phule

धुमधडाका, आमच्यासारखे आम्हीच आणि इतर चित्रपटामधून ऑनस्क्रीन साथ देणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता जोशी मामांना जोडीदार म्हणून लाभल्या . त्यांनीही एक अर्धागिनी म्हणून त्यांना उत्तम साथ दिली त्यामुळे त्यांनीही संकटाशी हसत हसत सामना केला. अनिकेत या सुपुत्रामुळे त्याचं कुटुंब पूर्ण झालं. पत्नी निवेदिता सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था हि स्थापन केली . या निर्मितीतून साकारलेला एक लक्षवेधी सिनेमा म्हणजेच एक डाव धोबीपछाड . मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ याचं नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरु आहे . हम पांच सारख्या मलिकेमधून मामांनी जवळपास ५ वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची अनेक पारितोषिके मिळवली आहेत . चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारी अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत, केवळ मित्रमंडळीत मिसळणारा आहे .

गोंधळात गोंधळ आणि गुपचूप या दोन्हीही सिनेमामध्ये रंजना सोबत त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आणि या दोन्हीही सिनेमासाठी त्यांना filmfare पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. रंजना सोबत त्यांचे अनेक इतर चित्रपटही गाजले . शब्दांचे खेळ करून ह्स्याचे फवारे उडवणाऱ्या अशोक सराफ ने मराठीत एक गाण हि गायलेय आणि त्याच सोबत कदी विनोदी तर कदी भयावह आवाज काढून लोकांना घाबरवल सुद्धा आहे . १९६९ साली सुरु झालेल्या या प्रवासात त्यांनी आत्तापर्यंत २२६ चित्रपट, ५ नाटक आणि ८ मलिका केलेले आहेत . अशोक सराफ हे चित्रपट सृष्टीचे मामा झाले आणि २१व्या शतकातही मामांच्या अभिनयाची जादू आपण अनेक चित्रपटामधून पाहतोय.

The post अशोक सराफ – एक असं व्यक्तिमत्व जो गेला ४० वर्ष मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून राज्य करतोय appeared first on SPOTyourstory.This post first appeared on Spotyourstory, please read the originial post: here

Share the post

अशोक सराफ – एक असं व्यक्तिमत्व जो गेला ४० वर्ष मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून राज्य करतोय

×

Subscribe to Spotyourstory

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×