भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी ओले खोबरे अर्धा वाटी लसूण 7-8पाकळ्या कढिपत्ता हिरवी मिरची एक 1कांदा बारीक चिरून गूळ आवडीनुसार 2 अमसुलं जिरेधणे पूड हिंग, हळद, तिखट, मीठ, तेल, कोथिंबीर कृती प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे. पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे.