Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

"ग्रेस" आणि आम्ही



    कवी ’ग्रेस ’यांना सन २०११ साठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि आमच्यातील, थोडाफार कवी असलेला, माणूस सुखावला.परंतू त्याचवेळी ग्रेस यांनी पुरस्कार उशीरा मिळाल्याबद्दल व्यक्त केलेली खंत आणि पारितोषिकाची रक्कम आपण कोणाही व्यक्ती अथवा संस्थेला देणार नसल्याचा,हा कोणीही न विचारताच व्यक्त केलेला निर्धार वाचून आम्हाला दि.२४ मार्च १९९८ रोजी लिहलेला (आणि "छूमंतर"या पुस्तकात समाविष्ट असलेला) आमचाच एक लेख आठवला आणि आम्हाला आमच्याच दूरदृष्टीची कमाल वाटली.तो लेख असा आहे-
 पारितोषिक प्रदेश
   आता माणिक गोडघाटेंच्या (पक्षी:ग्रेस) प्राक्तनात पारितोषिक प्राप्तीचा योग नाही,त्याला ’मिशावाले’नेमाडे किंवा ’बिनमिशावाले’डहाके काय करणार?(आता डहाके यांना मिशा आहेत की नाहीत हे आम्हाला माहीत नाही.परंतू ज्या अर्थी गोडघाटेंनी फक्त नेमाडे यांच्याच मिशांचा उल्लेख केला आहे,त्याअर्थी डहाकेंना मिशा नसाव्यात.असो.)आपल्याला पारितोषिक न मिळण्यामागे ’नेमाडे आणि टोळीचा’ हात असल्याचे म्हटले आहे.यापूर्वी आमचा असा समज होता की टोळ्या फक्त गुंडांच्या आणि त्यानुषंगाने पुढा-यांच्या असतात; परंतू गोडघाटेंनी साहित्यिकांच्याही टोळ्यांवर एवढ्या  ’ग्रेस’फुली प्रकाश टाकला आहे की,प्रत्येक साहित्यिकाने (आपापल्या घरच्या)आरशात स्वत:चा ’फेस’ काळजीपूर्वक तपासला असेल आणि आपण छोट्या शकील सारखे दिसतो की,दाऊदभाईसारखे दिसतो,हे पाहून ठेवले असेल.म्हणजे पुढे युध्दाचा प्रसंग उदभवलाच, तर तुमचा तो (म्हणजे पारितोषिक मिळालेल्यांचा)दाऊद तर आमचा(म्हणजे पारितोषिक न मिळालेल्यांचा)गवळी असा पवित्रा घेणे सोपे जाईल.ते असो.सांगायचा मुद्दा काय तर साहित्यिकांच्याही टोळ्या असतात आणि त्या पारितोषिकांच्या कुंपणावर पुस्तकं रोखून बसलेल्या असतात.अशा या टोळ्यांना उध्वस्त करण्याचं काम गोडघाटेंनी रसिकांवर सोपवलं आहे.(रसिकांनी काय काय करायचे? गोडघाटेंच्या कवितांचा अर्थ लावत बसायचे की,प्रयत्न करूनही अर्थ न लागणे व त्यामधून निर्माण होणारी चिडचीड गोडघाट्यांच्या हितशत्रूवर काढायची?) ते काही असो,आमच्या डोळ्यांपुढे सध्या तरी टोळीयुध्दाचे प्रसंग चमकू लागले आहेत.एकीकडे पारितोषिक प्राप्त आणि दुसरीकडे पारितोषिकापासून वंचित(आणि त्यामुळे चिंतित झालेली) मंडळी समोरासमोर(परंतू एकमेकांच्या आड लपून)उभी ठाकली आहेत.सारा आसमंत (ध्वनी) प्रदूषण भरून गेला आहे आणि त्यांना पांगविण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा मोर्चा पुढे पुढे येत आहे.त्या कोलाहलात गोडघाटेंच्या कविता (दुर्बोध नका हो म्हणू!)आक्रंदून उठल्या आहेत.गोडघाटे गरजताहेत-
पारितोषिक सरकारी;
निमसरकारी.
गल्लीतले;दिल्लीतले
पारितोषिक.
पारितोषिक
रस्तोरस्ती; गल्लीबोळात
पारितोषिक झगमगाटात;
व्यासपिठावर.
पारितोषिकं
खुपताहेत.
(पुढे ऐका-)
ती (पारितोषिकाची वेळ) गेली तेंव्हा
छनछन पैसा खुळावत होता
पारितोषिकात गुंतल्या रकमा
हा ग्रेस मोजीत होता.



This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

"ग्रेस" आणि आम्ही

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×