Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र

आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच ‘प्राजक्ता गायकवाड’ आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला आपण ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत ऐतिहासिक भूमिकेत पाहिलं आहे, पण आता ती एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेल आहे.

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. प्राजक्ता सोबत या मालिकेत आपल्याला अलका कुबल आठल्ये देखील पाहायला मिळणार आहेत. ‘गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची’ पाहा ‘आई माझी काळुबाई’ लवकरच सोनी मराठी वाहिनीवर…

The post सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र appeared first on MarathiStars.

Share the post

सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र

×

Subscribe to Marathistars.com | Marathi Movies | Reviews | Tv Serials | Actress | Actors | Trailer | Celebrities

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×